शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

Monsoon Session Of Parliament : संसदेत विरोधी पक्षांच्या हालचालींवर 'नजर'! काँग्रेसचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 5:59 PM

लोकसभेचे कामकाज सुरू असताना अधिकाऱ्यांच्या गॅलरीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांवर नजर ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने आज केला.

नवी दिल्ली -  लोकसभेचे कामकाज सुरू असताना अधिकाऱ्यांच्या गॅलरीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांवर नजर ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने आज केला. दरम्यान, या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. सोमवारी सकाळी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला सुरुवात झाल्यावर  काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले," अधिकाऱ्यांच्या गॅलरीत बसलेले एक अधिकारी वारंवार उठून विरोधी सदस्यांवर लक्ष ठेवत आहेत. तसेच त्याचे टाचण तयार करत आहेत, असा आरोप केला. अधिकारी त्याठिकाणी बसून टिपणे लिहू शकत नाहीत. आमच्यावर लक्ष ठेवले जात आहे. तसेच खासदारांची मोजणी केली जात आहे. त्यांना परवानगी कशी काय मिळाली.? दरम्यान, हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सदर अधिकारी तिथून उठून गेल्याचा दावाही खर्गे यांनी केला.   खर्गे यांनी केलेल्या आरोपांची दखल घेताना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन म्हणाल्या, " मी अधिकाऱ्यांच्या गॅलरीकडे पाहू शकत नाही. मात्र या विषयाची माहिती घेऊ, त्या गॅलरीमध्ये अधिकारी बसू शकतात. त्याशिवाय टीव्हीवरही याचे प्रक्षेपण होत असते. तरीही आपण या विषयात लक्ष घालू,  तर खर्गे यांच्या आरोपांना उत्तर देताना संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की संबंधित अधिकारी संसदीय कामकाज मंत्रालयाचे अधिकारी असून, ते तिथे बसू शकतात. तर या मुद्द्यावरून काँग्रेसला टोला लगावताना प्रकाश जावडेकर म्हणाले, संसदेच्या कामकाजाचे प्रक्षेपण टीव्हीवर होते. तिथे सगळे काही दिसते. अगदी कुणी डोळा मारला तरी तो दिसतो." 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाParliamentसंसदBJPभाजपाSumitra Mahajanसुमित्रा महाजन