शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

मंकीपॉक्सची 2 प्रकरणे समोर आल्यानंतर केंद्र सरकार सतर्क; परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 21:26 IST

Monkeypox news case in India : मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना सुरू केल्या असून आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाणार आहे.

नवी दिल्ली : एकीकडे देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असतानाच आता केरळमध्ये आढळलेल्या मंकीपॉक्समुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सोमवारी केरळमधील कुन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. यापूर्वी केरळमध्येच गेल्या आठवड्यात देशातील मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता. दरम्यान, मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना सुरू केल्या असून आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाणार आहे. याशिवाय, भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांची बंदरांवर तपासणी केली जाईल.

आरोग्य मंत्रालयाने विमानतळ आरोग्य कर्मचार्‍यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत आरोग्य अधिकाऱ्यांना मंकीपॉक्स ओळखण्यासाठी आणि उपचारांसाठी मार्गदर्शक तत्त्वांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, विमानतळ-बंदरे आणि इतर चेकपॉईंट्स आहेत, जेथून लोक परदेशातून भारतात येतात. त्यांच्यात समन्वय असावा, हे देखील सुनिश्चित करण्यात आले.

भारतात मंकीपॉक्सची दोन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. पहिले प्रकरण 35 वर्षीय तरुणाचे होते, हे प्रकरण 13 जुलै रोजी समोर आले होते, तर दुसरे प्रकरण 31 वर्षीय तरुणाचे आहे जे आज समोर आले आहे. या तरुणाला उपचारासाठी कुन्नूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही घटना केरळमधील असून दोन्ही तरुण आखाती देशातून आले होते.

केरळमध्ये आलेला दुसरा मंकीपॉक्सचा रुग्ण दुबईहून कर्नाटकच्या मंगळुरू विमानतळावर उतरला होता. आजाराची लक्षणे दिसू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. याआधी गुरुवारी, कोल्लम जिल्ह्यात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक आरोग्य उपाययोजना सुरू करण्यात राज्य आरोग्य अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी गेल्या आठवड्यात केरळला एक उच्चस्तरीय पथक पाठवले होते.

केंद्रीय पथकाची केरळला भेट!गेल्या आठवड्यात आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, केरळच्या कोल्लम जिल्ह्यातून मंकीपॉक्सची पुष्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने याची तपासण्यासाठी एक केंद्रीय पथक पाठवण्याचा आणि केरळ राज्य सरकारला आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना सुरू करण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अधिकाऱ्यांनी सांगितले होते की,  ही टीम राज्याच्या आरोग्य विभागांशी जवळून काम करेल आणि परिस्थितीचा आढावा घेईल. भारत सरकार परिस्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून आणि संभाव्य उद्रेक झाल्यास राज्यांशी समन्वय साधून सक्रिय उपाययोजना करत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यKeralaकेरळcorona virusकोरोना वायरस बातम्या