मनी पान- कापूस घटणार
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
नवी दिल्ली : अमेरिकेच्या कृषी खात्याच्या (यूएसडीए) अहवालानुसार भारतात उशिराने झालेल्या पेरणीमुळे उत्पादनात घट, हवामान व इतर कारणांमुळे सलग दुसर्या वर्षी (२०१५-२०१६ विपणन वर्ष) घटून कापसाचे उत्पादन ३.७५ कोटी गाठींचे होण्याचा अंदाज आहे. अमेरिकेच्या कृषी खात्याच्या अहवालानुसार विपणन वर्ष २०१५-२०१६ (ऑगस्ट-जुलै) साठी कापसाचे उत्पादन ३.८ कोटी गाठींचे होईल, तर सरकारचा अंदाज ३.५३ कोटी गाठींचा आहे. एक गाठ १७० किलोची असते.
मनी पान- कापूस घटणार
नवी दिल्ली : अमेरिकेच्या कृषी खात्याच्या (यूएसडीए) अहवालानुसार भारतात उशिराने झालेल्या पेरणीमुळे उत्पादनात घट, हवामान व इतर कारणांमुळे सलग दुसर्या वर्षी (२०१५-२०१६ विपणन वर्ष) घटून कापसाचे उत्पादन ३.७५ कोटी गाठींचे होण्याचा अंदाज आहे. अमेरिकेच्या कृषी खात्याच्या अहवालानुसार विपणन वर्ष २०१५-२०१६ (ऑगस्ट-जुलै) साठी कापसाचे उत्पादन ३.८ कोटी गाठींचे होईल, तर सरकारचा अंदाज ३.५३ कोटी गाठींचा आहे. एक गाठ १७० किलोची असते.यूएसडीएच्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, उशिराने झालेली पेरणी, हवामान व इतर पिकांच्या तुलनेत किमतीसारखा मुद्दा विचारात घेता किरकोळ प्रमाणात कापूस उत्पादन घटेल. त्यानुसार भारतात १.२ कोटी हेक्टरवर ३.७५ कोटी गाठींच्या उत्पादनाची शक्यता आहे. गुजरात व महाराष्ट्रात पेरणी सुरू झाली असली तरी जेथे हक्काचे पाणी आहे तेवढ्यापुरतीच ती मर्यादित आहे. वेगवेगळ्या राज्यांत किमती खाली आल्यामुळे शेतकरी जास्त क्षेत्रावर पेरणीचा विचार सोडून देतील.