प्रयागराज महाकुंभमधील सुंदर डोळ्यांची व्हायरल गर्ल मोनालिसा मध्य प्रदेशातील खरगोन येथील तिच्या घरी पोहोचली आहे. प्रयागराजमध्ये युट्यूबर्स आणि इतर लोकांना कंटाळून तिने घरी परतल्याचं सांगितलं. ती तिथे माळा विकू शकली नाही. काम ठप्प झालं. आता इथे आल्यानंतर तिला पैसे उधार घ्यावे लागत आहेत. त्याच वेळी, चित्रपटांमध्ये जाण्याबाबत मोनालिसा म्हणाली की, जर कुटुंबातील सदस्यांनी परवानगी दिली तर ती नक्कीच काम करेल.
महेश्वर जिल्ह्यातील जेल रोडजवळ राहणारी मोनालिसा आरोग्याच्या समस्यांमुळे खूप अस्वस्थ दिसत होती. महाकुंभमध्ये तिने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं होतं. पण त्यानंतर ती आपल्या घरी परतली. ती घरी परतल्यावर देखील लोक तिचा शोध घेतच आहेत. तिला चित्रपटाची ऑफर आल्याचं देखील म्हटलं जात आहे. तसेच तिचा मेकओव्हरचा व्हिडीओही तुफान व्हायरल झाला.
घरी पोहोचलेल्या व्हायरल गर्लने सांगितलं की, प्रयागराजमधील मीडिया आणि इतर लोकांमुळे तिला त्रास होत होता पण तिला चांगलंही वाटलं. तिथे माझी तब्येत बिघडली. माळा विकण्याचा व्यवसायही चांगला चालला नाही. यामुळे मला इथे येऊन पैसे उधार घ्यावे लागले. चित्रपटांमध्ये जाण्याबाबत मोनालिसा म्हणाली की, जर कुटुंबाने परवानगी दिली तर नक्कीच जाईन.
मोनालिसाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीमुळे काळजीत होतो. लोकांचं भरपूर प्रेम पाहिलं. चांगलंही वाटलं. टीआय साहेब आणि एसपी साहेबांनीही याला पाठिंबा दिला. महाकुंभात राहण्याचाही एक हेतू होता. पण मोनालिसाची तब्येत बिघडली होती. मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. आता ती थोडी बरी आहे. चित्रपटांसाठी नक्कीच फोन आलेला. जर कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं तर मोनालिसा नक्कीच चित्रपटांमध्ये काम करेल.