'भारतासाठी हा महत्त्वाचा दिवस', Air India च्या विक्रीवर ज्योतिरादित्य शिंदेंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 11:07 PM2021-10-08T23:07:22+5:302021-10-08T23:07:55+5:30

jyotiraditya scindia : 'मला आशा आहे की विमान कंपनी आपल्या यशस्वी संचानलद्वारे लोकांना जवळ आणण्याचे मिशन पुढे चालू ठेवेल', असेही ज्योतिरादित्य शिंदे म्हटले आहे.

momentous day for india aviation minister jyotiraditya scindia over air india sold to tata | 'भारतासाठी हा महत्त्वाचा दिवस', Air India च्या विक्रीवर ज्योतिरादित्य शिंदेंचे विधान

'भारतासाठी हा महत्त्वाचा दिवस', Air India च्या विक्रीवर ज्योतिरादित्य शिंदेंचे विधान

Next

नवी दिल्ली: टाटा समूहाकडून  (TATA Group) एअर इंडिया (Air India) खरेदी करणे, हा भारतासाठी महत्त्वाचा दिवस असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच, टाटा समूहाला एअर इंडियाची विक्री एअरलाइन्ससाठी एक नवीन पहाट आहे. विमान वाहक यशस्वी संचालनद्वारे लोकांना जवळ आणत राहील, अशी आशा ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी याबाबत बोलत होते. (momentous day for india aviation minister jyotiraditya scindia over air india sold to tata)

याचबरोबर, 'एअर इंडिया टाटा समूहात परतणे हे विमान कंपनीसाठी नवी पहाट आहे. नवीन व्यवस्थापनासाठी माझ्या शुभेच्छा आणि विमान कंपनीचे उड्डाण घेण्यासाठी नवीन धावपट्टी तयार करण्यासाठी कठीण काम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल दीपम सचिव  आणि नागरी उड्डयन मंत्रालयाचे अभिनंदन', असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. तसेच, 'मला आशा आहे की विमान कंपनी आपल्या यशस्वी संचानलद्वारे लोकांना जवळ आणण्याचे मिशन पुढे चालू ठेवेल', असेही ज्योतिरादित्य शिंदे म्हटले आहे.

तब्बल ६८ वर्षांनंतर सरकारी विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा टाटा समुहाच्या ताब्यात गेली आहे. एअर इंडियासाठी टाटा समूह आणि स्पाईसजेटच्या (Spicejet) अजय सिंग यांनी बोली लावली होती. एअर इंडियासाठी सरकारने टाटा समुहाची निवड केली. टाटा समुहाने यासाठी सर्वाधिक १८ हजार कोटी रूपयांची बोली लावली आणि जिंकली.

दरम्यान, १९३२ मध्ये टाटा ग्रुपने एअरलाइन्सच्या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. टाटा एअरवेज या भारतातल्या पहिल्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीचे स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण झाले आणि एअर इंडिया असे याचे नामांतरण झाले. सध्याच्या घडीला एअर इंडिया कर्जबाजारी झाली असून या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. तसेच मोदी सरकारने २०१७ मध्येच एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरू केला होता. पण त्यावेळी कंपनी खरेदी करण्यासाठी कोणतीच उत्सुकता दाखवली नाही. आता अनेक कंपन्या एअर इंडिया खरेदीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे.त्यासाठी टाटा कंपनीने देखील बोली लावली होती. आज टाटा समुहाने बोली जिंकली.

एअर इंडियावर कर्ज
कर्जाच्या बोज्याखाली अडकलेल्या एअर इंडियाला विक्रीसाठी सुरू करण्यात आलेली बोली प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. तसेच यावेळी नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे  (Aviation Minister Jyotiraditya Scindia) यांनी यापूर्वी तारीख बदलली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सरकारने यापूर्वी २०१८ मध्ये एअर इंडियातील (Air India) ७६ टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली होती. परंतु त्यावेळी सरकारला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर सरकारने कंपनीच्या पूर्णपणे विक्रीचा निर्णय घेतला. 

२०१७ मध्येच प्रक्रियेला सुरूवात
सरकारने २०१७ मध्येच एअर इंडियाच्या विक्रीचे प्रयत्न सुरू केले होते. परंतु त्यावेळी कंपन्यांनी त्यात फारसा सर दाखवला नव्हता. ऑक्टोबरमध्ये सरकारनं एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टच्या नियमांमध्ये ढील दिल्यानंतर काही कंपन्यांनी एअर इंडियाच्या खरेदीत रस दाखवला होता. नव्या नियमांअंतर्गत कर्जाच्या तरतुदीबाबत शिथिलता दाखवण्यात आली, जेणेकरून स्वामित्व असलेल्या कंपनीला पूर्णपणे कर्जाचा बोजा सहन करावा लागणार नाही. १९५३ मध्ये भारत सरकारनं ही कंपनी आपल्या अधिकार क्षेत्रात घेतली होती

Web Title: momentous day for india aviation minister jyotiraditya scindia over air india sold to tata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.