महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: September 6, 2015 23:09 IST2015-09-06T23:09:20+5:302015-09-06T23:09:20+5:30
नाशिक : जमीन व्यवहारासाठी पतीसोबत गेल्यानंतर तेथे मोबाइल गहाळ झाल्याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा चौघा संशियतांनी विनयभंग केल्याची घटना घडली आहे़

महिलेचा विनयभंग
न शिक : जमीन व्यवहारासाठी पतीसोबत गेल्यानंतर तेथे मोबाइल गहाळ झाल्याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा चौघा संशियतांनी विनयभंग केल्याची घटना घडली आहे़शुक्रवारी (दि़४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पीडित महिला आपल्या पतीसोबत शरणपूररोडवरील वसंत मार्केट परिसरातील संशयित समीर केदार व रामराव केदार यांच्याकडे जमीन व्यवहारासाठी गेले होते़ त्यावेळी महिलेचा मोबाइल गहाळ झाल्याने त्यांनी दोघांकडे विचारणा केली असता केदार यांच्यासह अन्य दोघांनी त्यांच्याशी झटापट करून त्यांचा विनयभंग केला़या झटापटीत महिलेच्या गळ्यातील ६२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्रही गहाळ झाले़ या प्रकरणी पीडित महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे़(प्रतिनिधी)