शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मोहम्मद शामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार?; 'या' मोठ्या पक्षानं दिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 9:08 AM

या वेगवान गोलंदाजाने न्यूझीलंडविरोधात दमदार कामगिरी करत ५७ रन्स देऊन ७ विकेट घेतल्या होत्या.

कोलकाता - BJP Offer to Mohammed Shami ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असलेली भाजपापश्चिम बंगालमध्ये क्रिकेटमधील मोठ्या चेहऱ्यावर डाव लावू शकते. भाजपाच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमध्ये क्रिकेट स्टार मोहम्मद शामी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. रणजी ट्रॉफीसाठी बंगालकडून खेळताना शामी एक वेगवान गोलंदाज म्हणून नावारुपाला आला. शामी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असला तरी आजही तो बंगालसाठी देशातंर्गत क्रिकेट खेळतो. 

सूत्रांनुसार, भाजपा नेतृत्वाने मोहम्मद शामीला ही ऑफर दिली आहे. त्यावर शामीचा अंतिम निर्णय येणं बाकी आहे. सध्या सर्जरीमुळे शामीनं क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेतली आहे. मोहम्मद शामी याला येत्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधून मैदानात उतरवण्याचा प्रस्ताव भाजपाने ठेवला आहे. यावर सकारात्मक चर्चा सुरू आहे. शामी निवडणुकीच्या मैदानात उतरला तर भाजपाला बंगालमध्ये अल्पसंख्याकबहुल जागांवर विजय मिळू शकतो असं भाजपाला वाटते. 

भाजपाला बशीरहट लोकसभा मतदारसंघातून मोहम्मद शामीला उभं करायचं आहे. हा मतदारसंघ अतिसंवेदनशील आहे. ज्या संदेशखाली इथं अलीकडेच महिलांवर अत्याचाराची गंभीर घटना घडली तो भाग बशीरहट लोकसभेचा आहे. या मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांची संख्या अधिक आहे. मोहम्मद शामीला या मतदारसंघातून निवडणुकीला उभं करणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरस्ट्रोक मानला जातो. 

मागील वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शामीने केलेल्या उत्कृष्ट खेळीमुळे त्याला अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आले. ३३ वर्षीय शामीने वर्ल्डकपमध्ये एकूण ७ मॅच खेळल्या. त्यात २४ विकेट पटकावल्या होत्या. या वेगवान गोलंदाजाने न्यूझीलंडविरोधात दमदार कामगिरी करत ५७ रन्स देऊन ७ विकेट घेतल्या होत्या. ही कामगिरी ५० षटकांच्या वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीय खेळाडूने केली होती. 

दरम्यान, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करुन काळजी घेणारे ट्विट केले होते. तुम्हाला लवकरात लवकर बरे व्हावे आणि चांगले आरोग्य मिळावे ही इच्छा, मला विश्वास आहे की तुम्ही या दुखापतीवर धैर्याने मात कराल अशा सदिच्छा मोदींनी दिल्या होत्या. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांकडून मला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देणारी वैयक्तिक चिठ्ठी मिळणे हे आश्चर्यकारक आहे. त्यांचा हा आपलेपणा आणि विचारशीलता माझ्यासाठी खरोखर आज खूप महत्त्वाचा आहे. मोदी सर, आपल्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, असे मोहम्मद शमीने म्हटलं होतं. 

टॅग्स :Mohammad Shamiमोहम्मद शामीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४