शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

व्यंकय्या नायडूंनी मोदी यांचा असंसदीय शब्द कामकाजातून काढला; विरोधकांवर केला होता हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 06:25 IST

नायडू यांनी विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी भाषणात उच्चारलेला ‘गुमराह’ हा शब्दही कामकाजातून वगळला.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संसदेत केलेल्या भाषणातील ‘झूठ’ हा शब्द राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी कामकाजातून वगळला आहे. शुक्रवारी नायडू यांच्या कार्यालयाने काढलेल्या अधिकृत आदेशात पंतप्रधानांच्या निवेदनातील नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरवरील ‘झूठ’ हा शब्द वगळण्यात आल्याचे म्हटले.

नायडू यांनी विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी भाषणात उच्चारलेला ‘गुमराह’ हा शब्दही कामकाजातून वगळला. विशेष म्हणजे मोदी यांनीही त्यांच्या भाषणात ‘गुमराह’ हाच शब्द वापरला होता. मोदी यांच्या भाषणातील शब्द नायडू यांनी वगळण्याची ही दुसरी वेळ होती.

११ ऑगस्ट, २०१८ रोजी मोदी यांनी काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांच्यावरील भाष्यांत वापरलेले काही शब्द नायडू यांनी वगळले होते. नायडू यांनी राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा यांनी ते तीन शब्द कामकाजातून काढून टाकावेत अशी मागणी करताना त्या शब्दांचा केलेला संदर्भदेखील वगळला. त्या शब्दांबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर हक्कभंगाची नोटीस आणण्याचीही चर्चा सुरू होती.

काय होती टीका?

नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा-सीएए आणि एनपीआरवर विरोधकांवर (काँग्रेस) कडवट हल्ला करताना मोदी यांनी विरोधक खोटे बोलून लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला होता. यामुळे गुरुवारपर्यंत चाललेल्या चर्चेदरम्यान गोंधळ निर्माण झाला.च्सभागृहाचा मूड काही वेगळाच आहे हे लक्षात घेऊन नायडू यांनी तो शब्द कामकाजातून काढून टाकला. ते म्हणाले, जे काही असंसदीय आहे ते काढून टाकले गेले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू