मोदींच्या विधानाने जगाच्या केंद्रस्थानी भारत, चीनविरुद्ध एकजूट, फिलिपिन्स, इंडोनेशियाही अँटी चायना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 03:24 AM2020-07-05T03:24:43+5:302020-07-05T06:51:10+5:30

चीनचे नाव घेतले नाही तरी मोदींच्या संबोधनानंतर चिनी दूतावासाने स्पष्टीकरण प्रसिद्ध केले. नाव घेतले नाही तरीही स्पष्टीकरण चीनने दिल्याने चीनशी सीमावाद असलेल्या देशांमध्ये भारताविषयी विश्वास वाढला

Modi's statement puts India at the center of the world, The unity of the world against China | मोदींच्या विधानाने जगाच्या केंद्रस्थानी भारत, चीनविरुद्ध एकजूट, फिलिपिन्स, इंडोनेशियाही अँटी चायना

मोदींच्या विधानाने जगाच्या केंद्रस्थानी भारत, चीनविरुद्ध एकजूट, फिलिपिन्स, इंडोनेशियाही अँटी चायना

Next

- टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता चीनला विस्तारवादी म्हटल्याने आशिया खंडातील चीनविरोधी देश एकवटले आहेत. चीनच्या अरेरावीपुढे न झुकण्याचे संकेत आता इंडोनेशियाने दिले आहेत. जपानने आधीच भारताची  पाठराखण केली. तर नेपाळमध्ये चीनधार्जिणे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांचे पद संकटात सापडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह दौऱ्यानंतर परराष्ट्र खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व प्रमुख देशांच्या दूतावासातील अधिका-यांशी संपर्क साधला. परराष्ट्र खात्यातीलू सूत्रांच्या माहितीनुसार. इंडोनेशिया. फिलिपिन्स, जपान, बांगलादेश, श्रीलंका, भूतान दूतावासाशी संपर्क साधून चीनचा विस्तारवादी चेहरा उघड केला.

दक्षिण चीन समुद्रात चीनला विरोध करण्यासाठी या देशांना भारताने बळ देण्याचे ठरवले आहे. आंतरराष्ट्रीय जगतात राजनैतिक चर्चामध्ये चीनविरोधामुळे भारत केंद्रस्थानी आला आहे. फिलिपिन्स, इंडोनेशियातदेखील चीनविरोधात लोकांमध्ये रोष आहे. दोन्ही देशांच्या प्रसारमाध्यमांनी त्यास ठळकपणे प्रसिद्धी दिली. दक्षिण चीन समुद्रात चीनने युद्धनोका सराव सुरू केल्याने या देशांमध्ये घबराट आहे. फिलिपिन्स व इंडोनेशियाने त्यास आक्षेप घेतला. केवळ जमीनच नव्हे तर समुद्रातदेखील चीनने विस्ताराची महत्त्वकांक्षा बाळगली असल्याने आशिया खंडात भारताकडेच साºयांचे लक्ष आहे. हाँगकाँगच्या रहिवासी व सध्या सिंगापूर विद्यापीठात शिकवणाºया प्रा. यांग ची यांचीदेखील याकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, चीनचा विस्तारवाद वाढला आहे.

...चीनपासून अंतर

रशियातील शहरावरदेखील चिनी प्रसारमाध्यमे हक्क सांगत आहे. भारताच्या भूमिकेमुळे अमेरिका, जर्मनी, जपान व रशियादेखील चीनसोबत आंतरराष्ट्रीय जगतात उभा राहणार नाही. पंतप्रधान मोदी शुक्रवारी लेह दौºयावर गेले होते. जवानांशी संवाद साधताना त्यांनी चीनचा बुरखा फाडला.

चीनचे नाव घेतले नाही तरी मोदींच्या संबोधनानंतर चिनी दूतावासाने स्पष्टीकरण प्रसिद्ध केले. नाव घेतले नाही तरीही स्पष्टीकरण चीनने दिल्याने चीनशी सीमावाद असलेल्या देशांमध्ये भारताविषयी विश्वास वाढला, असेही निरिक्षण प्रा. यांग ची यांनी नोंदवले. चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे आर्थिक बोज्याखाली असलेल्या पाकिस्तानने मात्र चीनचे समर्थन केले आहे.

Web Title: Modi's statement puts India at the center of the world, The unity of the world against China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.