शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या भाषणांची पातळी खूपच घसरली - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:07 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची पातळी खूप घसरली आहे. यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची पातळी खूप घसरली आहे. यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, अशी टीका करीत अशा व्यक्तीला जनतेने पंतप्रधान करू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे संयोजक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त गंज पेठ येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी मोदी व पवार यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकांनंतर एच.डी. देवेगौडा यांच्यासारखी व्यक्ती पंतप्रधान होईल, याचा आंबेडकर यांनी पुनरुच्चार केला. भारतीय जनता पक्ष सत्तेत येणार नाही. मोदींचे संतुलन बिघडल्याने अशा व्यक्तीस जनतेने पुन्हा पंतप्रधान पदावर बसवू नये. राज्यातील निकालांबाबत सट्टा बाजारातही संभ्रम आहे. त्यामुळे मलाही सांगता येणार नाही. मात्र, वंचित बहुजन आघाडीला मान्यताप्राप्त पक्ष होण्याइतपत जागा नक्की मिळतील, असा दावा आंबेडकर यांनी केला.निवडणूक झाल्यानंतर पवार यांनी लगेच दुष्काळी गावांचा दौरा केला. त्यानंतर आम्ही दुष्काळी दौरा केल्यामुळे राज्य शासनाला जाग आल्याचा दावा पवार यांनी केला. पवार यांचे नाव न घेता आंबेडकर म्हणाले, मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. ही आमची संस्कृती नाही. मीही अनेकवेळा दुष्काळी भागांचा दौरा केला आहे. पण त्याबाबत कधीच मार्केटिंग केले नाही. एक सत्तेवर बसले आहेत. आणि दुसरे ५० वर्ष सत्तेत होते. त्यांनी दुष्काळी निवारणासाठी किती प्रयत्न केले आहेत? उलट आपल्या मतदारसंघात पाणी पळविले.पवार यांची भीती अनाठायीबारामतीत वेगळा निकाल लागला तर ईव्हीएमवरील लोकांचा विश्वास उडेल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. पवार यांची ही भीती अनाठायी आहे. बारामतीमध्ये झालेल्या विकासकामांमुळे सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी