प्रशासनात जनतेचे योगदान घेण्यासाठी मोदींचे पोर्टल
By Admin | Updated: July 26, 2014 23:39 IST2014-07-26T23:39:11+5:302014-07-26T23:39:11+5:30
प्रशासन चालविण्यात जनतेचे मत जाणून घेण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका संकेतस्थळाची सुरुवात केली.

प्रशासनात जनतेचे योगदान घेण्यासाठी मोदींचे पोर्टल
नवी दिल्ली : प्रशासन चालविण्यात जनतेचे मत जाणून घेण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका संकेतस्थळाची सुरुवात केली. या पोर्टलवर गंगा विकास आणि कौशल्य विकास यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर जनतेला आपल्या सूचना व मत सरकार्पयत पोहोचविता येईल.
याला जन-केंद्रित मंच’ असे नाव देण्यात आले आहे. सरकारला 6क् दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याची सुरुवात करण्यात आली. ‘अनेक लोकांची राष्ट्र उभारणीच्या कामात हातभार लावण्याची इच्छा आहे, असा आपल्या 6क् दिवसांच्या सरकारचा अनुभव आहे. माय गव्ह (े8ॅ5.ल्ल्रू.्रल्ल) हे नागरिकांना चांगल्या कामकाजात योगदान करण्याची संधी उपलब्ध करून देणारे तंत्रज्ञानावर आधारित एक माध्यम आहे. हा मंच जनता आणि सरकार यांच्यातील दरी कमी करेल. सरकारमधील लोकांच्या सहभागाशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. हा सहभाग केवळ निवडणुकीपुरताच मर्यादित राहू नये’, असे मोदी यांनी म्हटल्याचे सरकारी निवेदनात म्हटले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)