उघड्यावर लघुशंका करताना आढळले मोदींचे मंत्री
By Admin | Updated: June 28, 2017 23:12 IST2017-06-28T23:12:58+5:302017-06-28T23:12:58+5:30
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियान, शौचालयांचा वापर यासाठी आग्रही भूमिका मांडत असतानाच त्यांचे सहकारी

उघड्यावर लघुशंका करताना आढळले मोदींचे मंत्री
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियान, शौचालयांचा वापर यासाठी आग्रही भूमिका मांडत असतानाच त्यांचे सहकारी मात्र या प्रयत्नांना हरताळ फासताना दिसत आहेत. मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्री आपला दौऱ्यादरम्यान उघड्यावर लघुशंका करताना आढल्याची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहेत.
मोदी सरकारमध्ये कृषिमंत्री असलेले राधामोहन सिंह यांची उघड्यावर लघुशंका करत असतानाची छायाचित्रे समोर आली आहेत. संपूर्ण लावाजम्यासह दौऱ्यावर निघालेले मंत्रिमहोदय वाटेत एका भिंती शेजारी लघुशंका करत असल्याचे छायाचित्रांमध्ये दिसत आहे. मात्र ही छायाचित्रे नेमकी कधीची आहेत याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही. मात्र सोशल मीडियावर नेटिझन्सना शेअर करण्यासाठी मसाला मात्र या छायाचित्रांनी पुरवला आहे.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून स्वच्छ भारत अभियान धडाक्यात सुरू केले आहे. त्यासाठी जोरदार प्रचार प्रसारही सुरू आहे. स्वत: मोदी स्वच्छ झालेल्या अनेक गावांचे कौतुक करत आहेत. प्रत्येक गावात शौचालये बांधली जावीत यासाठी ते आग्रही आहेत. मात्र दुसरीकडे त्यांच्याच मंत्रिमडळातील सहकारी या अभियानाला हरताळ फासत असल्याचे चित्र दिसत. त्यामुळे राधामोहन सिंह हे सध्या नेटिझन्सच्या निशाण्यावर आहेत.