वाराणसीत मोदींचा 'हाऊसफुल्ल' रोड शो

By Admin | Updated: May 8, 2014 19:17 IST2014-05-08T18:19:14+5:302014-05-08T19:17:54+5:30

निवडणूक आयोगाने सभेसाठी परवानगी नाकारल्यानंतरही भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी वाराणसीत आले असून मोठ्या प्रमाणात रोड शो करत त्यांनी शक्तीप्रदर्शन केले आहे.

Modi's 'Housefull' Road Show in Varanasi | वाराणसीत मोदींचा 'हाऊसफुल्ल' रोड शो

वाराणसीत मोदींचा 'हाऊसफुल्ल' रोड शो

ऑनलाइन टीम

वाराणसी, दि. ८ - निवडणूक आयोगाने सभेसाठी परवानगी नाकारल्यानंतरही भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी वाराणसीत आले असून मोठ्या प्रमाणात रोड शो करत त्यांनी शक्तीप्रदर्शन केले आहे. बनारस हिंदू विद्यापीठाजवळ हेलिकॉप्टरमधून उतरलेले मोदी गाडीतून भाजप कार्यालयाच्या दिशेने निघाले असून चहुबांजूनी भाजप कार्यकर्त्यांची गर्दी दिसत आहे.  भारतीय जनता पक्षाने रोड शोची अधिकृत घोषणा केली नसली तरीही मोदी शहरात येणार हे कळताच भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी वाराणसीत गर्दी केली असून संपूर्ण शहर भगव्या रंगाने न्हाऊन निघाले आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या गेटपासून ते भाजप कार्यालयाच्या दिशेने जाणा-या मार्गाच्या दोन्ही बाजूंना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उभे असून ते मोदींच्या नावाच्या घोषणा देत आहेत. भाजपच्या कार्यालयात पोचून मोदी त्यांच्या सहका-यांना संबोधित करणार आहेत. 
दरम्यान गुरूवारी होणा-या सभेसाठी परवानगी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या नरेंद्र मोदींनी गंगाआरतीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. मोदी वाराणसी घाटावर गंगाआरतीला हजर राहणार होते. मात्र गुरुवारी सकाळी मोदींनी गंगाआरतीला उपस्थित राहणार नाही अशी माहिती ट्विटरद्वारे दिली होती.   
 

Web Title: Modi's 'Housefull' Road Show in Varanasi