मोदी म्हणजे देशाला मिळालेले 'गॉड्स गिफ्ट' - शिवराज सिंह चौहान

By Admin | Updated: March 7, 2016 13:49 IST2016-03-07T13:47:47+5:302016-03-07T13:49:44+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भारताला मिळालेलं गॉड्स गिफ्ट (देवाची भेट) आहे' अशा शब्दांत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोदींचे कौतुक केले।

Modi's 'God's gift' received by the country - Shivraj Singh Chauhan | मोदी म्हणजे देशाला मिळालेले 'गॉड्स गिफ्ट' - शिवराज सिंह चौहान

मोदी म्हणजे देशाला मिळालेले 'गॉड्स गिफ्ट' - शिवराज सिंह चौहान

>ऑनलाइन लोकमत
वृंदावन, दि. ७ - ' पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे भारताला मिळालेलं गॉड्स गिफ्ट (देवाची भेट) आहे' अशा शब्दांत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोदींचे कौतुक केले आहे. वृंदावन येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या संमेलनात तरूण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चौहान यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. 
'पंतप्रधान मोदींकडे देशासाठी अनेक चांगल्या योजना असून त्यांची योग्यरितीने अमलबजावणी करण्याची दांडगी इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे. ते जगात जिथे कुठेही जातात, तेथील लोक मोदी, मोदी असा त्यांच्या नावाचा गजर करतात. मोदी म्हणजे देवाने भारताला दिलेली भेट आहे. २०२२ पर्यंत ते भारताला विश्वगुरू बनवतील' असा विश्वासही चौहान यांनी व्यक्त केला. 
एकीकडे मोदींची तोंडभरून स्तुती करतानाच त्यांनी काँग्रेस पक्षावरही चांगलाच निशाणा साधला. जेएनयू प्रकरणावरून काँग्रेसवर निशाणा साधताना त्यांनी ' महात्मा गांधींचा पक्ष असलेल्या काँग्रेसला लाज वाटली पाहिजे.. जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणा-या राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे' अशी टीका चौहान यांनी केली. ' गरीबांचे रक्त शोषणाऱ्या काँग्रेसला गरीबांविषयी बोलण्याचा काय अधिकार आहे?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 

Web Title: Modi's 'God's gift' received by the country - Shivraj Singh Chauhan