मोदींच्या शिस्तीला सरकारी बाबूंचा प्रखर विरोध
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:01+5:302015-01-29T23:17:01+5:30
कामकाजाचा हिशेब ठेवणाऱ्या यंत्रांची तोडफोड

मोदींच्या शिस्तीला सरकारी बाबूंचा प्रखर विरोध
क मकाजाचा हिशेब ठेवणाऱ्या यंत्रांची तोडफोडनितीन अग्रवाल : नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिस्त शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अजिबात भावलेली नाही. कार्यालयीन कामासाठी वेळेवर कार्यालयात पोहोचण्यास हे बाबू काही तयार नाहीत. बाबू आणि सरकार यांच्यात शिस्त पालनावरून ओढाताण सुरू झाली आहे आणि सरकारी बाबू माघार घ्यायला तयार नसल्याचे दिसत आहे.केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी बाबूंच्या कार्यालयात येणे आणि जाण्याच्या वेळेचा रेकॉर्ड ठेवणाऱ्या बायोमेट्रिक यंत्रांपैकी ५० हून जास्त यंत्रांची तोडफोड करण्यात आली आहे किंवा ते चोरी तरी गेले आहेत. बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम (बीएएस) लावणाऱ्या केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या बाबत संबंधित विभागांकडे रीतसर तक्रारही केलेली आहे. विभागांच्या जबाबदार अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात बायोमेट्रिक यंत्राची मोडतोड आणि यंत्र गायब होण्याच्या घटना अतिशय गंभीर असल्याचे नमूद केले आहे. संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या या पत्रात मोडतोड झालेल्या वा चोरी गेलेल्या बायोमेट्रिक यंत्रांच्या जागी आता नवे यंत्र बसविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ही नवी बायोमेट्रिक यंत्रे लावण्याचा खर्च संबंधित विभागांनीच करावयाचा आहे, हेही त्यात आवर्जून सांगण्यात आले आहे.लावण्यात आलेल्या बीएएस यंत्रांपैकी ३६ यंत्रांचे चार्जर फोडण्यात आले आहेत. १३ यंत्रांना जोडण्यात आलेले टॅबलेट तोडण्यात आल्याचे दिसून आले आहे. २ यंत्रांचे फिंगर प्रिंट स्कॅनर फोडण्यात आले आहेत तर दोन ठिकाणी यंत्रेच गायब आहेत, असे या पत्रात म्हटले आहे. केंद्र सरकारच्या ज्या मंत्रालयांचे बाबू मोदींच्या मिशन बीएएसचा सर्वाधिक विरोध करीत आहेत, त्यात परराष्ट्र, पेट्रोलियम, मानव संसाधन, क्रीडा, आरोग्य, कृषी आणि कंपनी कामकाज मंत्रालयांचा समावेश आहे. या मंत्रालयांपैकी बहुतांश मंत्रालयांची कार्यालये शास्त्री भवन, कृषी भवन, श्रमशक्ती भवन, निर्माण भवन, लोकनायक भवन आणि राष्ट्रीय मीडिया केंद्र (एनआयसी) येथे आहेत.धक्कादायक बाब म्हणजे ज्या एनआयसीमधून बीएएस प्रकल्प संचालित केला जातो त्याच एनआयसीमध्ये सर्वांत जास्त बायोमेट्रिक यंत्रांची तोडफोड करण्यात आली आहे. यांपैकी बहुतांश कार्यालयांमध्ये सामान्य लोकांना प्रवेश बंदी आहे आणि जवळपास सर्वच कार्यालयांमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात असतात.नरेंद्र मोदींच्या ड्रीम प्रोजेक्ट डिजिटल इंडिया अंतर्गत केंद्र सरकारच्या दिल्लीतील सर्वच कार्यालयांमध्ये किमान १००० बायोमेट्रिक हजेरी यंत्रे, ५००० फिंगर प्रिंट स्कॅनर्स आणि डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन करणारे २०० स्कॅनर लावण्यात आले होते. ही यंत्रे फ्रान्सच्या मोफार्े नावाच्या कंपनीकडून खरेदी करण्यात आली होती आणि त्यांना कर्मचाऱ्यांच्या आधार कार्डला जोडण्यात (लिंक) आले होते. देशभरातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची हजेरी बीएएसला जोडण्याची केंद्र सरकारची योजना आहे.कर्मचाऱ्यांची हजेरी लाईव्ह बघण्याची व्यवस्थासरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती केवळ बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली नसून त्यांची उपस्थिती आता थेट (लाईव्ह) बघण्याचीही सोय करण्यात आली आहे. त्यासाठी अटेंडन्स.जीओव्ही.आयएन (ं३३ील्लिील्लूी.ॅङ्म५.्रल्ल) ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटनुसार शुक्रवारी २९ जानेवारीला केंद्र सरकारच्या एकूण ९५७०० कर्मचाऱ्यांपैकी ५१८०१ कर्मचारी कार्यालयात आले होते. ४३६ कार्यालयांमध्ये ७५९ बायोमेट्रिक यंत्रे काम करीत होती. बीएएसचा वापर करणाऱ्यांपैकी ६१.९ टक्के कर्मचारी वेळेवर कार्यालयात पोहोचले. ७.२ टक्के कर्मचारी निर्धारित १० वाजतानंतर आले आणि ३.१ टक्के कर्मचारी सकाळी ११ वाजता कामावर आले. याशिवाय किमान २७.८ टक्के कर्मचारी वेळेच्या आधीच कार्यालयात पोहोचले होते.३६ चार्जरची तोडफोड/चोरी१३ टॅबलेट फोडले२ फिंगर प्रिंट स्कॅनर फोडले२फिंगर प्रिंट स्कॅनरची चोरी