शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:03 IST

"जर आपण नरेंद्र मोदी यांना म्हणालात की, आम्ही आपल्याला मत देतो, आपण व्यासपीठावर येऊन नाचा, तर ते नाचतीलही," असे राहुल गांधी म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कंबर कसून मैदानात उतरले आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुजफ्फरपूर येथून आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांच्यासह एका संयुक्त रॅलीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला. "जर आपण नरेंद्र मोदी यांना म्हणालात की, आम्ही आपल्याला मत देतो, आपण व्यासपीठावर येऊन नाचा, तर ते नाचतीलही," असे राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना राहुल म्हणाले, मोदीजींना छठपूजा अथवा यमुना नदीच्या स्वच्छतेसंदर्भात काही देणेघेणे नाही, त्यांना केवळ तुमची मते हवी आहेत. यावेळी त्यांनी, दिल्लीतील प्रदूषित यमुना नदीमध्ये पूजा करणाऱ्या भाविकांची आणि पंतप्रधानांसाठी 'खास तयार केरण्यात आलेल्या तलावातील त्यांच्या स्नाना'ची तुलना केली. एवढेच नाही तर, 'मोदीजींनी त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ केली, त्यांना छठपूजेशी काहीही देणेघेणे नाही,' असेही ते म्हणाले.

भाजपचा पलटवार -राहुल गांधींच्या या टीकेवर सत्ताधारी भाजपने पलटवार केला आहे. राहुल गांधी यांची भाषा 'लोकल गुंडासारखी' आहे. पंतप्रधान मोदींना मतदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा राहुल गांधींनी अपमान केला आहे. त्यांचे वक्तव्य भारतीय मतदार आणि लोकशाहीची थट्टा उडवणारे असल्याचे, भाजपने म्हटले आहे.

'मत चोरीचा प्रयत्न होऊ शकतो' -यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आपला मतचोरीच जुना राग धरत आरोप केला. ते म्हणाले, त्यांनी महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुका चोरल्या आणि आता बिहारमध्येही तसाच प्रयत्न करतील." तसेच, बिहारमधील मतदार यादीतून सुमारे ६६ लाख नावे वगळल्याचा उल्लेख करत, त्यांनी लोकांना 'महागठबंधन'ला मतदान करण्याचे आवाहन केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi attacks Modi in Bihar; BJP retaliates sharply.

Web Summary : Rahul Gandhi criticized PM Modi in Bihar, alleging he'd even dance for votes. He questioned Modi's concern for छठपूजा and यमुना cleanliness. BJP retorted, calling Rahul's language 'local goonda-like', insulting voters and democracy.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५congressकाँग्रेसBJPभाजपा