अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर सैन्य कारवाई करत, तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना ताब्यात घेत अमेरिकेत नेले. या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून आता एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
"५६ इंचाची छाती' असेल तर..." -मुंबईमध्ये शनिवारी एका जनसभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले, "नरेंद्र मोदीजी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, जर ट्रम्प आपले सैन्य पाठवून व्हेनेझुएलामधून तिथल्या अध्यक्षांना उचलू शकतात, तर मोदीजी '५६ इंचाची छाती' आहे, तर पाकिस्तानात घुसून २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अजहर आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना उचलून आणा भारतात." एवढेच नाही तर, "जर ट्रम्प करू शकतात, तर आपण आकय कमी आहात का? जर ट्रम्प करू शकतात तर आपल्यालाही करावेच लागेल," असेही ओवेसी म्हणाले.
भारतीय नागरिकांनी व्हेनेझुएलामध्ये अनावश्यक प्रवास टाळावा -व्हेनेझुएलातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता, भारत सरकारने शनिवारी (३ जानेवारी २०२६) रात्री उशिरा एक ट्रॅव्हल अॅडव्हायजरी (Travel Advisory) जारी केली आहे. यात, भारतीय नागरिकांनी व्हेनेझुएलामध्ये अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. तसेच तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीयांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याच्या आणि काराकस येथील भारतीय दूतावासच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या व्हेनेझुएलामध्ये किती भारतीय? -सध्या व्हेनेझुएलामध्ये साधारण ५० अनिवासी भारतीय आणि ३० भारतीय वंशाचे लोक वास्तव्यास आहेत. मदुरो यांच्या अटकेनंतर संपूर्ण जगात खळभळ उडाली आहे. यातच, रशिया आणि चीनसारख्या देशांनी अमेरिकेच्या या कारवाईचा निषेध केला आहे.
Web Summary : Owaisi urged Modi to emulate Trump by capturing 26/11 Mumbai attack masterminds from Pakistan. This follows the US action in Venezuela. India issued a travel advisory for Venezuela, where approximately 80 Indians reside, amid rising tensions after Maduro's arrest.
Web Summary : ओवैसी ने मोदी से ट्रंप की तरह पाकिस्तान से 26/11 के मुंबई हमले के मास्टरमाइंड को पकड़ने का आग्रह किया। यह वेनेजुएला में अमेरिकी कार्रवाई के बाद आया है। भारत ने वेनेजुएला के लिए यात्रा सलाह जारी की, जहां मदुरो की गिरफ्तारी के बाद बढ़ते तनाव के बीच लगभग 80 भारतीय रहते हैं।