सुधारित - सावरकरांच स्मारक

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:45+5:302015-08-08T00:23:45+5:30

फ्रान्समध्ये होणार सावरकरांचे

Modified - Memorial to Savarkar | सुधारित - सावरकरांच स्मारक

सुधारित - सावरकरांच स्मारक

रान्समध्ये होणार सावरकरांचे
आंतरराष्ट्रीय स्मारक - मार्सेलिसच्या महापौरांचा सकारात्मक प्रतिसाद
पुणे : फ्रान्समधील मार्सेलिसच्या समुद्रात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी घेतलेल्या ऐतिहासिक उडीच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी भारत सरकारने दिलेल्या स्मारकाच्या प्रस्तावास मार्सेलिसच्या महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबतचे सोपस्कार वेळीच पूर्ण झाल्यास साधारणपणे वर्षभरात हे स्मारक आकारास येण्याची शक्यता आहे.
सावरकांच्या जीवनचरित्रात त्यांनी मार्सेलिस बंदरात मारिया बोटीतून मारलेल्या उडीला फार महत्त्व आहे. त्या घटनेला मागील ८ जुलैला १०५ वर्षे पूर्ण झाली. सावरकरांच्या त्या उडीचे स्मारक व्हावे, तेही फ्रान्समधील त्या किनार्‍यावरच व्हावे यासाठी सावरकर मध्यवर्ती संस्थेच्या माध्यमातून गेली काही वर्षे प्रयत्न करण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Modified - Memorial to Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.