शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

सीबीआय प्रमुखांना हटवले तरी मोदी वाचणार नाहीत, राहुल गांधींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 6:39 PM

सीबीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादाला आता राजकीय रूप मिळू लागले आहे.

नवी दिल्ली - सीबीआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादाला आता राजकीय रूप मिळू लागले आहे. काँग्रेसने या वादाचा संबंध राफेल विमान कराराशी जोडला असून, देशभरातील सीबीआय कार्यालयांसमोर आंदोलन केले. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या आंदोलनाची सूत्रे आपल्या हाती घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. सीबीआय प्रमुखांना हटवले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला. सीबीआयप्रमुखांना हटवण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी यांना आज अटक करण्यात आली होती. दरम्यान, लोधी कॉलनी पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यावर राहुल गांधी यांनी मोदींवर घणाघाती टीका केली. "मोदी पळू शकतात, लपू शकतात, पण शेवटी सत्य समोर येईलच. सीबीआय प्रमुखांना हटवल्यामुळे कोणताही फायदा होणार नाही. पंतप्रधानांनी सीबीआय प्रमुखांविरोधात कारवाई केली. ही अत्यंत घाईगडबडीने केलेली कारवाई आहे. अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

  सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांचा वाद आणि लाचखोर अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे देशातील वातावरण तापले आहे. यातच पंतप्रधान मोदी यांनी राफेल घोटाळ्याची चौकशी थांबविण्यासाठी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची हकालपट्टी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच काँग्रेसकडून आज देशभरात आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदी