मोदींनी गुजरातचे पंतप्रधान होऊ नये-
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30
मोदींनी गुजरातचे पंतप्रधान होऊ नये

मोदींनी गुजरातचे पंतप्रधान होऊ नये-
म दींनी गुजरातचे पंतप्रधान होऊ नये-राज ठाकरे यांची टीका: पदाधिकारी मेळाव्यात भाजपा लक्ष्यमुंबई- नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदास लायक असल्याचे मत देशात सर्वप्रथम मीच व्यक्त केले होते. मात्र मोदींनी देशाचे पंतप्रधान असल्यासारखे वर्तन करावे गुजरातचे पंतप्रधान होऊ नये, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या शिवसैनिकांत जशी रग होती तशी ती मनसैनिकांत आपल्याला दिसायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.मनसेच्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच राज यांनी पदाधिकार्यांच्या मेळाव्यात राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. मोदी यांच्यावर टीका करणारे राज ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व काय, असा सवाल यावर आपल्याला भाजपाकडून केला जाऊ शकतो. मात्र त्यावर आपले उत्तर हेच आहे की, मुंगी माणसाला चावू शकते पण माणसाची कितीही इच्छा झाली तरी माणूस मुंगीला चावू शकत नाही. त्यामुळे मोदींच्या तुलनेत आपण मुंगी असलो तरी आपण त्यांच्यावर टीका करण्याचा आपला धर्म सोडणार नाही, असे संकेत राज यांनी दिले.वादळ कसे निर्माण करायचे ते आपल्याला चांगले ठावूक असून ते आपण निर्माण करणार असे सांगताना प्रत्येक निवडणूक काही तरी शिकवत असते. मागील निवडणुकीने विजयाची शिकवण दिली तर यावेळच्या निवडणुकीने पराभवाची शिकवण दिली, असे ते बोलले. मनसे सोडून जाणार्या नेत्यांविषयी आपल्याला काही बोलायचे नाही, असे सांगताना मीडियाने आपल्या पक्षाची फार चिंता करु नये, असा टोलाही लगावला. (विशेष प्रतिनिधी)..........................................नेते व्यासपीठावर नाहीतराज ठाकरे भाषण करीत असताना पक्षातील एकाही नेत्याला व्यासपीठावर बसवले नव्हते किंवा नेत्यांचा साधा नामोल्लेखही त्यांनी केला नाही. त्याचवेळी पक्षातील युवा नेत्यांचे नामोल्लेख करून राज यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. यापुढे कार्यकर्त्यांशी स्काइपवर संवाद साधणार असल्याचे जाहीर केले. मनसेच्या प्रत्येक शाखेचे बँक खाते उघडण्याचे आदेश दिले..............................................भारतकुमार राऊत मनसेच्या व्यासपीठावरज्येष्ठ पत्रकार व माजी राज्यसभा सदस्य भारतकुमार राऊत यांनी या शिबीरात मनसैनिकांना राजकीय मार्गदर्शन केले. राजकारणातील अंतिम आशास्थान हे राज हेच असल्याचा उल्लेख राऊत यांनी केल्याचे समजते.