दंगलींसाठी जबाबदार असणारे मोदी हे शैतानच - ओवेसी

By Admin | Updated: October 5, 2015 12:23 IST2015-10-04T17:11:52+5:302015-10-05T12:23:23+5:30

गुजरात दंगलीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवरुन टीका करताना एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी मोदींचा उल्लेख शैतान आणि क्रूर असा केला आहे.

Modi, who is responsible for the riots, is Satanic - Owaisi | दंगलींसाठी जबाबदार असणारे मोदी हे शैतानच - ओवेसी

दंगलींसाठी जबाबदार असणारे मोदी हे शैतानच - ओवेसी

ऑनलाइन लोकमत

पाटणा, दि. ४ - गुजरात दंगलीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवरुन टीका करताना एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी मोदींचा उल्लेख शैतान आणि क्रूर असा केला आहे. या सभेत ओवेसी यांनी मोदींवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

रविवारी बिहारमधील किशनगंज येथे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी प्रचार सभा घेतली. या सभेत ओवेसी यांनी मोदींवर तिखट शब्दात प्रहार केला. गुजरातमधील दंगलीत मुसलमानांना चोहोबाजूंनी घेरुन मारले जात होते.  या दंगलींसाठी मोदीच जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी केला.  दंगलीतील दोषींच्या हातात बेड्या असत्या तर काँग्रेस मुसलमानांसाठी गंभीर असल्याचे स्पष्ट झाले असते. आम्ही भाजपाकडून पैसे घेतल्याचा आरोप धर्मनिरपेक्षवादी पक्ष करतात. पण आमच्यासाठी जेव्हा काम करायचे तेव्हा तुम्ही गप्प बसला होता अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. आम्हाला १० जणांची गरज नाही, आम्ही एकटेच पुरेसे आहोत, आम्ही आमचे लक्ष्य गाठतोच असे त्यांनी सांगितले. 

Web Title: Modi, who is responsible for the riots, is Satanic - Owaisi