शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी आता म्हातारे झाले, त्यांनी हिमालायाकडे प्रस्थान करावं - जिग्नेश मेवाणींची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:22 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक सुरू आहे. प्रचारादरम्यान भाजपाविरोधात आघाडी उघडत पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या जिग्नेश मेवाणी यांनी निकाल लागल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे प्रहार करणे सुरूच ठेवले आहेत.

नवी दिल्ली -  गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक सुरू आहे. प्रचारादरम्यान भाजपाविरोधात आघाडी उघडत पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या जिग्नेश मेवाणी यांनी निकाल लागल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे प्रहार करणे सुरूच ठेवले आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतील मोदींवर स्वैर टीका करताना जिग्नेश मेवाणी यांनी मोदी आता म्हातारे झाले आहेत. त्यांनी संन्यास घेऊन हिमालयात जावं, असा खोचक सल्ला मोदींना दिला आहे. तसेच आपण केलेल्या टीकेबाबत खुद्द राहुल गांधी यांनीही माफी मागण्यास सांगितले तरी माफी मागणार नाही, असे त्यांनी सुनावले आहे. या मुलाखतीत मेवाणी म्हणाले, "2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज झालो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता म्हातारे झाले आहेत. ते आपली जुनी रटाळ भाषणे लोकांना सुनावत आहेत. त्यामुळे त्यांनी आता राजकारणातून विश्रांती घेत निवृत्ती स्वीकारली पाहिजे. तसेच हिमालयात जाऊन तेथेचा पुढील जीवन जगावं," या वक्तव्यानंतर माफी मागणार का अशी विचारणा केली असता मेवाणी यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला. "खुद्द राहुल गांधींनी जरी मला माफी मागायला सांगितले तरी मी माघार घेणार नाही. मी माझ्या वक्तव्यावर कायम आहे, असे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये भाजपाच्या जागांमध्ये झालेल्या घटीबाबत त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा गुजरातमध्ये 150 जागा जिंकण्याचा दावा करत होते. मात्र त्यांचे पुरते गर्वहरण झाले आहे. 2019 सालीसुद्धा हेच होईल. हा आमच्या आंदोलनाचा विजय आहे. आम्ही सभागृहापासून रस्त्यापर्यंत आपल्या आंदोलनावर भर देऊ आणि यांना 2019 साली सत्तेतून खाली खेचू. देशात फूट पाडणाऱे राजकारण जनतेला समजले आहे. त्यामुळे देशाला आता आमच्यासारख्या दलित, युवा आंदोलनांमधून समोर आलेल्या युवकांची गरज आहे.  दरम्यान, जिग्नेश मेवाणीने आपल्या ट्विटर आकाऊंटवर एक शायरी लिहून  सातत्याने संघर्ष करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपल्यावर काँग्रेस आणि राहुल गांधींनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात