Modi-Shah's chemistry brings life to the BJP | मोदी-शहांच्या केमिस्ट्रीने आणली भाजपमध्ये जान
मोदी-शहांच्या केमिस्ट्रीने आणली भाजपमध्ये जान

लोकमत न्यूज नेटवर्क
अनेक जणांकडे चांगले गुण असतात पण त्यांचा समन्वय असलेलाच सर्वोत्कृष्ट नेता बनतो. कूटनीतीज्ज्ञ, युद्धनीतीकार, प्रभावी वक्ता असे विविध गुण असलेले नरेंद्र मोदी हे म्हणूनच वडनगर येथील चहावाला ते दुसऱ्यांदा पंतप्रधान असा प्रवास करू शकले.

कुशल नेता
नरेंद्र मोदी यांच्याकडे असलेली राजकीय परिपक्वता आणि चातुर्य हे त्यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच स्पष्टपणे दिसून आली होती. २०१४मध्ये भाजपने पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार ते थेट पंतरप्रधान पद अशी झेप घेतल्यानंतर दुसऱ्यांदा हेच मिळवून त्यांनी आपले कुशल नेतृत्व सिद्ध केले.

कुटनितीज्ज्ञ
राजकीय नेत्याबरोबरच नरेंद्र मोदी यांच्याकडे असलेली कूटनीतीही महत्वाची आहे. यामुळे त्यांच्या विरोधामध्ये असणाºयांनाही मोदी यांना साथ देणे भाग पडलेले दिसून आले.

युद्धनीतीकार
युद्ध जिंकायचे तर त्यासाठी आधीपासून डावपेच आखायला हवेत, याची पूर्ण जाणीव मोदी यांना आहे. त्याची झलक त्यांच्या कामातून दिसून येते. लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच प्रचाराचे मुद्दे , प्रचाराचे तंत्र आणि रचना यावर त्यांची टीम काम करीत असते. संपूर्ण देशामध्ये मोदी यांचे नाव एक ब्रॅण्ड म्हणून प्रस्थापित करणे, निवडणूक प्रचाराच्या यात्रांचे नियोजन अशा सर्व मुद्यांवर मोदी यांची युद्धनीती आपल्याला दिसून येते.
प्रभावी प्रचारतंत्र
मोदींकडे असलेले प्रभावी प्रचारतंत्र हे त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे. देशभरामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. या कार्यकर्त्यांकडून त्यांना सर्व माहिती मिळत असते. या माहितीचे विश्लेषण करून मोदी यांचे प्रचारतंत्र तयार होते आणि त्यानुसार काम केले जाते.


कणखर स्वभाव
नरेंद्र मोदी यांच्या स्वभावामध्ये असलेल्या कणखरपणाचा प्रत्यय वारंवार येत असतो. ते भाषणात जे काही मांडतात त्यापासून कधीच माघार घेत नाहीत. त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांमधूनही त्यांच्या स्वभावातील कणखरपणा दिसून आलेला आहे.


वक्ता दशसहस्त्रेशू
प्रभावी वक्तृत्वाची लाभलेली देणगी हा नरेंद्र मोदी यांचा आणखी एक स्वभाव विशेष होय. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर अमोघ वक्तृत्वाची देणगी असलेला हा नेता आहे. त्यांच्या भाषणामधून इतिहासाचे दाखले, काही विधानांची उडविलेली खिल्ली यासह भविष्याचे चित्र दाखविणारी आश्वासने अशा विविध बाबींचा समावेश असलेला दिसून येतो.


Web Title: Modi-Shah's chemistry brings life to the BJP
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.