नवी दिल्ली : या वृत्ताच्या अनुषंगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, राफेल प्रकरणातील भ्रष्टाचाराचे एकेक पदर आता उलगडू लागले आहेत व पैशाचा प्रवासही स्पष्ट होत आहे. पंतप्रधौन मोदी अंबानींचे दलाल म्हणून काम करत आहेत. ज्यांच्यावर मोदींची कृपा असेल त्यांना काहीही मिळू शकते. मोदी है तो मुमकीन है! राफेल करार आणि अंबानींच्या कंपनीस मिळालेली ही करमाफी यांचा तारीखवार घटनाक्रम देत त्यांनी या दोन्हींमध्ये कमालीचे साम्य असल्याचा दावा केला. फक्त अंबानींच्याच कंपनीवर व त्यातही तोट्यात असलेल्या कंपनीवर फ्रान्स सरकारने एवढी मेहेरनजर का करावी, असा त्यांचा सवाल होता. विमानांची खरेदी आणि याचा हा अन्योन्य संबंध नाही तर दुसरे काय, असे विचारत ते म्हणाले की, कोणता चौकीदार चोर आहे, हे यावरून दिसते.
मोदी है तो मुमकीन है; काँग्रेसचा जोरदार हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:33 IST