गुवाहाटी : लोकसभेत मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करण्यातच धन्यता मानली, अशी टीका करीत आसाममधील निवडणुकांत मतदार भाजपचा पराभव करतील, असा दावा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे केला.ते म्हणाले की मी लोकसभेतील भाषणाद्वारे पंतप्रधानांना चार प्रश्न विचारले होते. पण इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या पूर्वीच्या भाषणातील काही विधानेच त्यांनी ऐकवली आणि एकाही प्रश्नाचे उत्तर मात्र दिले नाही. (वृत्तसंस्था)मोदी यांनी निवडणुकांपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे देशाप्रमाणेच आसाममधील जनतेचाही भ्रमनिरास झाला आहे. निवडणुकांच्या राजकारणासाठी आसाममधील काही धार्मिक गटांना हाताशी धरून येथील सहिष्णू वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
‘मोदी व्यक्तिगत हल्ले करीत आहेत’
By admin | Updated: March 5, 2016 02:42 IST