चीनप्रती मोदी व्यावहारिक दृष्टिकोन बाळगण्याची आशा

By Admin | Updated: May 15, 2014 03:29 IST2014-05-15T03:29:14+5:302014-05-15T03:29:14+5:30

चीनच्या एका प्रमुख दैनिकाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील पुढील सरकार चीनप्रती व्यावहारिक दृष्टिकोन ठेवील, अशी आशा व्यक्त केली आहे;

Modi hopes to have a practical approach to China | चीनप्रती मोदी व्यावहारिक दृष्टिकोन बाळगण्याची आशा

चीनप्रती मोदी व्यावहारिक दृष्टिकोन बाळगण्याची आशा

बीजिंग : मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपा विजयी होणार असल्याचे संकेत मिळाले असताना चीनच्या एका प्रमुख दैनिकाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील पुढील सरकार चीनप्रती व्यावहारिक दृष्टिकोन ठेवील, अशी आशा व्यक्त केली आहे; मात्र मोदी सत्तेवर आल्यास ते तिबेट व सीमा मुद्यावर कडक भूमिका घेऊ शकतात, असेही म्हटले आहे. कम्युनिस्ट पार्टी आॅफ चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध मुख्य वृत्तामध्ये मोदी हे चीनबाबत व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. विविध मतदानोत्तर चाचण्यांत मोदी भारताचे पुढील पंतप्रधान बनण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘ग्लोबल टाइम्स’ने मोदी पंतप्रधान झाल्यास भारत-चीन संबंधांची स्थिती काय असेल यासंदर्भात आठवडाभरात प्रसिद्ध केलेले हे दुसरे वृत्त आहे. मोदींनी पुढील सरकारचे नेतृत्व केले तर भारत-चीन संबंधांमध्ये अधिक जवळीकता निर्माण होईल, असे यापूर्वीच्या म्हणजे सहा मे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका लेखात म्हटले होते. हा लेख ‘शांघाय इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल स्टडीज्’ने लिहिला होता. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी चीनचा चार वेळा दौरा करून गुजरातमध्ये गुंतवणुकीसाठी येथील नेत्यांशी चर्चा केली आहे. मोदींनी आपला व्यावहारिक दृष्टिकोन दाखवला असून चिनी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी चीनमध्ये प्रयत्न केले आहेत. ब्रिटनची लेबर पार्टी उत्सुक लंडन : भाजपा नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर त्यांच्यासोबत काम करण्यास आपण उत्सुक आहोत, असे ब्रिटनमधील विरोधी पक्ष लेबर पार्टीने म्हटले आहे. लेबर पार्टीच्या कार्यकाळादरम्यानच गुजरातेतील दंगली प्रकरणी मोदी यांच्यावर राजकीय बहिष्कार टाकण्यात आला होता हे उल्लेखनीय. मोदींसोबतचे संबंध पूर्ववत करण्यासाठी पक्षाने अलीकडे अनेक प्रस्ताव आणले आहेत. लेबर फ्रेन्डस् आॅफ इंडियाचे अध्यक्ष आणि संसद सदस्य बॅरी गार्डिनर यांनी गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये मोदींना आधुनिक भारताचे भविष्य या विषयावर व्याख्यानासाठी हाऊस आॅफ कॉमन्समध्ये आमंत्रित करून याची सुरुवात केली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Modi hopes to have a practical approach to China