शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'7 दिवसांत आपल्या अधिकाऱ्यांना परत बोलवा, अन्यथा...', मोदी सरकारचा ट्रुडोंना अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 14:23 IST

भारताने कॅनडावर त्यांच्याच शब्दात वार केला आहे. केंद्र सरकारने कॅनडाला आपले 41 अधिकारी परत बोलवण्यास सांगितले आहे.

India-Canada: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडा, यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान, आता भारताने ट्रूडो सरकारला भारतातील आपल्या अधिकाऱ्यांना(डिप्लोमॅट) परत बोलावण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. मोदी सरकारने कॅनडाला 10 ऑक्टोबरपर्यंत भारतातून 41 अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या भारतात कॅनडाचे 62 डिप्लोमॅट आहेत. मोदी सरकारने ही संख्या 21 वर आणण्यास सांगितले आहे. म्हणजेच भारत सरकारने कॅनडाला 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्या 41 अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. 10 ऑक्‍टोबरनंतरही हे अधिकारी भारतातच राहिले, तर त्यांचे अधिकार काढून घेतले जातील, असे भारताने सांगितले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅनडाचे परराष्ट्र मंत्रालय आणि भारत सरकारने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. पण भारताने कॅनडाला संख्येबाबत आधीच सांगितले होते की, दोन्ही देशांतील मुत्सद्दींची उपस्थिती समान असावी. 21 सप्टेंबर रोजी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते, भारतात कॅनडाच्या अधिकाऱ्यांची संख्या, कॅनडातील भारतीय अधिकाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ती कमी करण्याची गरज आहे.

रिपोर्ट्सनुसार, परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावरील कॅनडाच्या सिनेट समितीचे अध्यक्ष पीटर बोहम यांनी सांगितले की, भारतातील अतिरिक्त कॅनेडियन मुत्सद्दींवर भारत सरकारच्या निर्णयामुळे परिस्थिती आणखी बिघडेल. या निर्णयानंतर दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव कमी करणे अधिक कठीण होणार आहे. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांना भारताकडून अशा प्रतिक्रियेची अपेक्षा नाही, असे पीटर बोहम यांचे म्हणणे आहे. 

दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव कायम खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप करत कॅनडाने 18 सप्टेंबर रोजी एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याची हकालपट्टी केली, त्यानंतर दोन्ही देशातील राजनैतिक तणाव वाढला. त्यानंतर भारताने कॅनडाच्या एका उच्च अधिकाऱ्याला पाच दिवसांत देश सोडण्याचे आदेश जारी केले होते. दरम्यान, भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले असून, कॅनडातील हिंसाचाराच्या कोणत्याही घटनेत भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCanadaकॅनडाIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय