शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार हिंदुत्त्व आणि विकास दोन्ही पातळ्यांवर अपयशी ठरले; प्रवीण तोगडियांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 10:28 IST

तोगडिया यांनी पत्रात मोदींसोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.

नवी दिल्ली: सध्याची परिस्थिती पाहता मोदी सरकार हिंदुत्त्व आणि विकास या दोन्ही पातळ्यांवर अपयशी ठरले आहे, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली. मोदी सरकारने ना धड हिंदुत्त्वाविषयीच्या अपेक्षा पूर्ण केल्या, ना विकासाच्या आश्वासनाची पूर्तता केली. निवडणुका जिंकणे हा केवळ टक्केवारीचा, मतदारयाद्यांचा आणि ईव्हीएम मशिन्सचा खेळ आहे. मात्र, लोकांच्या आश्वासनांची पूर्ती केल्यानंतरच एखादा नेता प्रजाहित दक्ष म्हणवला जातो. त्यामुळे सत्तेच्या नादात वाहवत जाऊ नका. हे म्हणजे कृतींमध्ये आलेल्या जडत्त्वाचे लक्षण आहे, देशनिर्माण नव्हे, असे तोगडिया यांनी सांगितले. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही पाठवले आहे. या पत्राद्वारे तोगडिया यांनी मोदींकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. यावेळी आपण मोदींना अयोध्येतील राम मंदिर आणि समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीच्या आश्वासनाचे काय झाले, याबाबत विचारणार असल्याचेही तोगडिया यांनी सांगितले. याशिवाय, तोगडिया यांनी पत्रात मोदींसोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. बऱ्याच काळापासून आपल्यामध्ये मनमोकळेपणाने बोलणे झालेले नाही. जसे 1972 ते 2005 या काळात व्हायचे. देश, गुजरात आणि तुमच्या वैयक्तिक जीवनात जे प्रश्न उपस्थित झाले. त्यावर आपण दोघांनीही वेळोवेळी एकमेकांसोबत राहून काम केले आहे. आमचे घर आणि कार्यालयात तुमचे येणे, सोबत भोजन, चहापान करणे, मनमोकळेपणाने हसणे यापैकी काहीही तुम्ही विसरला नसाल.मित्रत्व आणि मोठा भाऊ या नात्याने आपली विविध विषयांवर मोकळेपणाने चर्चा व्हायची. एकमेकांसाठी एकमेकांसोबत उभे राहायचो. जे 2002 नंतर कमी होत गेले. सत्तास्थानी गेल्यानंतर तुम्ही माझ्यापासून आणि मूळ विचारसरणीपासून फारकत घेतली. तरीही आजही माझ्या मनात मित्रत्व आणि संवादाची अपेक्षा कायम आहे, त्यामुळेच हा पत्रप्रपंच केला आहे. राम मंदिर, गोवंश हत्या,  समान नागरी कायदा अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करायची असल्याचे तोगडिया यांनी पत्रात नमूद केले आहे.  

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडियाNarendra Modiनरेंद्र मोदी