शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Modi@4: मोदी सरकारने घराणेशाहीचं राजकारण मोडून काढले- अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 15:38 IST

रालोआ सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे झाल्याबद्दल पत्रकार परिषदेत अमित शाह बोलत होते. 

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने देशातील घराणेशाहीचे आणि लांगुलचालनाचे राजकारण मोडून काढले अशा स्पष्ट शब्दांमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली. रालोआ सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे झाल्याबद्दल पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळेस पत्रकार परिषदेत अमित शाह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लांगुलचालनाचे, घराणेशाहीचे तसेच जातीवादाचे राजकारण संपवले आहे. त्याबरोबरच मोदी यांनी विकासाच्या राजकारणाला अग्रक्रम दिला दिला आहे.

वन रँक वन पेन्शन सारखे प्रलंबित विषयही या सरकारने तडीस लावले आहेत. काळा पैसा रोखण्यासाठी विशेष तपासणी पथकाची निर्मिती या सरकारने केली. असे शाह यांनी सांगितले. काळ्या पैशाचा मुद्दा 2014 साली प्रचाराच्या वेळेस भाजपाने उचलला होता. अमित शाह यांच्याबरोबर अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही या सरकारबद्दल मत व्यक्त केले आणि आर्थव्यवस्था सुधारत असल्याचे फेसबूकवर लिहिलेल्या ब्लॉगमधून मांडले आहे.

गेल्या चार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील उत्तम सरकार आणि उत्तम अर्थकारण व चांगले राजकारण यांच्या एकत्रित मिश्रणामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारली. एकेकाळी भारत फ्रॅजाईल फाईव्ह (नाजूक अर्थव्यवस्था असणारे पाच देश) यादीतून जगभरात ब्राईट स्पॉट म्हणजे लखलखता तारा म्हणून आता ओळखला जातो असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. अरुण जेटली यांनी मुद्रा योजना, पीक विमा योजना आणि ग्रामिण भागातील रस्त्यांसाठी दिलेल्या निधीबाबतही यांनी लिहलं आहे. पायाभूत सुविधांच्या विकासावर या वर्षात 134 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचं आव्हान स्वीकारवं अशी टीका केली होती, त्यावर अरुण जेटली यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांची खिल्ली उडवताना त्यांनी लिहिलं आहे, कराचा पैसा सरकारच्या खिशात जात नसतो हे काँग्रेस अध्यक्षांना माहिती असायला हवं.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारतGovernmentसरकार