शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

मोदी सरकारच्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधकांची विकेट?

By बाळकृष्ण परब | Updated: January 8, 2019 14:46 IST

थोडक्यात सांगायचं तर गरीब सवर्णांना देऊ केलेल्या आरक्षणाचा प्रत्यक्षात लाभ कधी मिळेल याबाबत छातीठोकपणे कुणीच सांगू शकणार नाही. मात्र आरक्षण विधेयक पारीत झाले तर श्रेय भाजपा आणि मोदींना तर पडले तर त्याचे खापर विरोधकांच्या माथी, असा एकूण मामला आहे. 

ठळक मुद्देराफेल घोटाळ्यातील आरोपांचे विमान घोंघावत असताना मोदी सरकारने सवर्णांना आरक्षणाची घोषणा करून सवर्णांच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आणला गरीब सवर्णांसाठी आरक्षणाच्या घोषणेमुळे आगामी काही दिवसांत भाजपाविरोधात आक्रमक असलेल्या अनेक पक्षांची कोंडी झाली आहे.सवर्ण आरक्षण विधेयक पारीत झाले तर श्रेय भाजपा आणि मोदींना तर पडले तर त्याचे खापर विरोधकांच्या माथी, असा एकूण मामला आहे

- बाळकृष्ण परब अनेक वर्षांनंतर केंद्रात स्पष्ट बहुमताचे सरकार चालवणाऱ्या नरेंद्र मोदींना गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गतनिवडणुकीत दिलेल्या वारेमाप आश्वासनांपैकी अनेक आश्वासनांची पूर्तता न झाल्याने सरकारवर प्रश्नांची चौफेर सरबत्ती होत आहे. त्यातच पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल सरकारविरोधात गेल्याने होऊ घातलेली लोकसभा निवडणूक मोदी सरकारला जड जाणार असेच वाटत आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारने सोमवारी कुणाच्या ध्यानिमनी नसताना एक अशी चाल खेळली आहे ज्यामुळे आगामी काही दिवसांत भाजपाविरोधात आक्रमक असलेल्या अनेक पक्षांची कोंडी झाली आहे. ती चाल म्हणजे सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कारकिर्दीत धक्कातंत्राचा वापर करून विरोधकांना वारंवार नामोहरम केले आहे. आताही डोक्यावर राफेल घोटाळ्याच्या आरोपांचे विमान घोंघावत असताना मोदी सरकारने सवर्णांना आरक्षणाची घोषणा करून सवर्णांच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आणला आहे. त्यामुळे नाही म्हटले तरीही सरकारविरोधातील अनेक मुद्द्यांवरून लक्ष विखुरले जाणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षांनी या निर्णयाबाबत घेतलेली सावध भूमिका त्याचेच उदाहरण म्हणता येईल. हा निर्णय लोकसभा  निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र या निर्णयाविरोधात भूमिका घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार नाही. दुसरीकडे आप, बसपासारख्या पक्षांनी निर्णयाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. निवडणुकांमध्ये भाजपाला होणाऱ्या मतदानामध्ये सवर्ण जातींचे प्रमाण अधिक असते. मात्र भाजपाप्रमाणेच काँग्रेसलाही सवर्ण जातींमधून लक्षणीय प्रमाणात मतदान होते. काँग्रेसने जिथे सवर्ण जातींचा पाठिंबा गमावलाय, अशा ठिकाणी काँग्रेस कमकुवत झाली आहे. त्यामुळे सवर्ण आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची कोंडी होणार आहे. काही प्रमाणात तीच परिस्थिती महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.  आता सवर्णांना दिलेले आरक्षण घटनेच्या चौकटीत बसत नाही. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही. असे आरक्षण दिल्यास ते असंवैधानिक ठरवून सर्वोच्च न्यायालयात ते टिकणार नाही. न्यायालय ते रद्द करेल. असे घटना तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान,  केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी लोकसभेमध्ये हे विधेयक सादर केले आहे. या विधेयकाविरोधात भूमिका घेणे विरोधी पक्षांना अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता बहुतेक सर्वच पक्ष आज सावध भूमिकेमध्ये दिसत आहेत.  समजा तशी भूमिका कुठल्या पक्षाने घेतली आणि हे विधेयक पडले तर त्या पक्षाविरोधात आयते कोलीत भाजपाला मिळणार आहे.

अगदी थोडक्यात सांगायचं तर गरीब सवर्णांना देऊ केलेल्या आरक्षणाचा प्रत्यक्षात लाभ कधी मिळेल याबाबत छातीठोकपणे कुणीच सांगू शकणार नाही. मात्र सवर्ण आरक्षणाचे हे आश्वासन भाजपासाठी गाजराची पुंगी ठरणार आहे. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. कारण सवर्ण आरक्षण विधेयक पारीत झाले तर श्रेय भाजपा आणि मोदींना तर पडले तर त्याचे खापर विरोधकांच्या माथी, असा एकूण मामला आहे. 

टॅग्स :reservationआरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस