शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना झटका; नुकसान भरून काढण्यासाठी थेट बचतीवर हात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 10:38 PM

छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून जोरदार झटका

नवी दिल्ली: छोट्या बचत योजनांमध्ये (Small Savings Scheme) गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारनं झटका दिला आहे. छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनुसार, छोट्या योजनांवरील व्याज दर १.१० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२१ म्हणजेच उद्यापासून याची अंमलबजावणी सुरू होईल.मोठा 'आधार'! पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यास मुदतवाढ; लाखो नागरिकांना दिलासापीपीएफवरील व्याज दरात ७० बेसिस पॉईंटची कपातपब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (Public Provident Fund) गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारनं धक्का दिला आहे. व्याज दरात ७० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. आतापर्यंत पीपीएफचा व्याजदर ७.१ टक्के होता. आता ते ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. पाच वर्षांच्या नॅशनल सेविंग्स स्कीमवरील (National Savings Certificate) व्याजदरातही ९० बेसिस पॉईंटची कपात कपात करण्यात आली. आधी गुंतवणुकीवर ६.८ टक्के व्याज मिळायचं. यापुढे ५.९ टक्के व्याज मिळेल.सुकन्या समृद्धी योजनेतही कपातमुलींचं शिक्षण आणि त्यांच्या लग्नासाठी सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेच्या (Sukanya Samriddhi Yojana) व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सध्या ७.६ टक्के व्याज मिळतं आहे. मात्र आता हा व्याजदर ६.९ टक्के इतका असेल. म्हणजेच ७० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे.मोठी बातमी! एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात; उद्यापासून नवे दर लागू होणारएक वर्षाच्या डिपॉजिटमध्ये १.१० टक्क्यांची कपातएका वर्षासाठी करण्यात येणाऱ्या डिपॉझिटवर आधी ५.५ टक्के व्याज मिळायचं. आता ते ४.४ टक्क्यांवर आणण्यात आलं आहे. म्हणजेच १.१० टक्क्यांची कपात केली गेली आहे. दोन वर्षांच्या डिपॉझिटवर यापुढे ५.५ टक्क्यांऐवजी ५.० टक्के, तीन वर्षांच्या डिपॉझिटवर ५.५ टक्क्यांऐवजी ५.१ टक्के, पाच वर्षांच्या डिपॉझिटवर ६.७ टक्क्यांऐवजी ५.८ टक्के आणि पाच वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवर ५.८ टक्क्यांऐवजी ५.३ टक्के व्याज मिळेल.ज्येष्ठ नागरिकांनाही धक्काज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme) सध्याच्या घडीला ७.४ टक्के व्याज मिळतं. आता ते ६.५ टक्के करण्यात आलं आहे. मासिक उत्पन्न खात्यावर (Monthly Income Account) ६.६ टक्क्यांऐवजी ५.७ टक्के व्याज मिळेल. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर (NSC) ६.८ टक्क्यांच्या जागी ५.९ टक्के व्याज मिळेल.

टॅग्स :PPFपीपीएफ