मोदी सरकारचा सर्वसामान्यांना झटका; नुकसान भरून काढण्यासाठी थेट बचतीवर हात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 10:38 PM2021-03-31T22:38:23+5:302021-03-31T22:45:56+5:30

छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून जोरदार झटका

Modi government's blow to the common man; Hands on direct savings to offset losses | मोदी सरकारचा सर्वसामान्यांना झटका; नुकसान भरून काढण्यासाठी थेट बचतीवर हात

मोदी सरकारचा सर्वसामान्यांना झटका; नुकसान भरून काढण्यासाठी थेट बचतीवर हात

Next

नवी दिल्ली: छोट्या बचत योजनांमध्ये (Small Savings Scheme) गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारनं झटका दिला आहे. छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनुसार, छोट्या योजनांवरील व्याज दर १.१० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२१ म्हणजेच उद्यापासून याची अंमलबजावणी सुरू होईल.

मोठा 'आधार'! पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यास मुदतवाढ; लाखो नागरिकांना दिलासा

पीपीएफवरील व्याज दरात ७० बेसिस पॉईंटची कपात
पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (Public Provident Fund) गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारनं धक्का दिला आहे. व्याज दरात ७० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. आतापर्यंत पीपीएफचा व्याजदर ७.१ टक्के होता. आता ते ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. पाच वर्षांच्या नॅशनल सेविंग्स स्कीमवरील (National Savings Certificate) व्याजदरातही ९० बेसिस पॉईंटची कपात कपात करण्यात आली. आधी गुंतवणुकीवर ६.८ टक्के व्याज मिळायचं. यापुढे ५.९ टक्के व्याज मिळेल.




सुकन्या समृद्धी योजनेतही कपात
मुलींचं शिक्षण आणि त्यांच्या लग्नासाठी सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेच्या (Sukanya Samriddhi Yojana) व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सध्या ७.६ टक्के व्याज मिळतं आहे. मात्र आता हा व्याजदर ६.९ टक्के इतका असेल. म्हणजेच ७० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे.

मोठी बातमी! एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात; उद्यापासून नवे दर लागू होणार

एक वर्षाच्या डिपॉजिटमध्ये १.१० टक्क्यांची कपात
एका वर्षासाठी करण्यात येणाऱ्या डिपॉझिटवर आधी ५.५ टक्के व्याज मिळायचं. आता ते ४.४ टक्क्यांवर आणण्यात आलं आहे. म्हणजेच १.१० टक्क्यांची कपात केली गेली आहे. दोन वर्षांच्या डिपॉझिटवर यापुढे ५.५ टक्क्यांऐवजी ५.० टक्के, तीन वर्षांच्या डिपॉझिटवर ५.५ टक्क्यांऐवजी ५.१ टक्के, पाच वर्षांच्या डिपॉझिटवर ६.७ टक्क्यांऐवजी ५.८ टक्के आणि पाच वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवर ५.८ टक्क्यांऐवजी ५.३ टक्के व्याज मिळेल.

ज्येष्ठ नागरिकांनाही धक्का
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme) सध्याच्या घडीला ७.४ टक्के व्याज मिळतं. आता ते ६.५ टक्के करण्यात आलं आहे. मासिक उत्पन्न खात्यावर (Monthly Income Account) ६.६ टक्क्यांऐवजी ५.७ टक्के व्याज मिळेल. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर (NSC) ६.८ टक्क्यांच्या जागी ५.९ टक्के व्याज मिळेल.

Web Title: Modi government's blow to the common man; Hands on direct savings to offset losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :PPFपीपीएफ