शीलेश शर्मा - नवी दिल्ली
केंद्रात सत्तेत असताना महागाईच्या मुद्दय़ांवरून काँग्रेस आणि संपुआ सरकारला बेजार करणा:या भाजपाप्रणीत मोदी सरकारला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. काँग्रेस अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकारला महागाईच्या मुद्दय़ांवरून घेरणार आहे. 7 जुलैपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनासाठी काँग्रेस समविचारी पक्षांसोबत संयुक्त रणनीती आखून सरकारवर हल्लाबोल करणार आहे.
काँग्रेस रेल्वे भाडेवाढ, फळे आणि भाज्यांच्या वाढलेल्या प्रचंड किमतीला मुद्दा बनवणार आहे, असे सूत्रंनी सांगितले. सरकारने महागाईवर अंकुश न ठेवल्यास ते त्यांच्यासाठी महागात पडेल, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ता शकील अहमद यांनी सरकारला दिला. भाजपा नेत्यांनी नुसती विधाने करण्यापेक्षा महागाई रोखण्यासाठी पावले उचलावी, असे ते म्हणाले. शकील अहमद यांच्या या टिप्पणीतून काँग्रेस संसदेत मोदी सरकारला घेरण्याचे संकेत मिळत आहेत. मोदी सरकारने कितीही प्रयत्न केले तरी सहजासहजी महागाईवर नियंत्रण मिळवणो शक्य नसल्याचे काँग्रेसला चांगले ठाऊक आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महागाई रोखण्याचे अनेक प्रयत्न केले होते; परंतु त्यात यश आले नाही आणि त्याचा फटका काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत बसला. महाराष्ट्रासह काही राज्यांत विधानसभा निवडणुका जवळ आहेत. काँग्रेस आता भाजपाच्या शैलीत उत्तर देण्याची तयारी करीत आहे. मात्र त्यासाठी काँग्रेस अर्थसंकल्पाची प्रतीक्षा करीत आहे. मान्सून कमजोर राहण्याचे संकेत मिळाल्याने सरकारने अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा केली तरी महागाईचे भूत त्यांचा पिच्छा पुरविल्याशिवाय राहणार नाही, असे काँग्रेसला वाटत आहे.
पेट्रोल 1.69 रुपये तर डिङोल 50 पैशाने महाग
रेल्वे भाडेवाढीनंतर मोदी सरकारने इंधन दरवाढीचा आणखी एक धक्का दिला. इराक संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात वधारलेले कच्च्या तेलाचे भाव या पाश्र्वभूमीवर पेट्रोल 1़69 रुपये प्रतिलिटर, तर डिङोल 5क् पैसे प्रतिलिटर महागले आह़े
नव्या दरवाढीत राज्यांतर्गत विक्री कर किंवा व्हॅटचा समावेश नाही़ त्यामुळे व्हॅटसह विविध शहरांतील पेट्रोल व डिङोलच्या किमती वेगवेगळ्या असू शकतात़ सोमवारी मध्यरात्रीपासून ही भाववाढ लागू झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल चार डॉलर रुपयांची वाढ झाली आह़े यामुळे पेट्रोलच्या किमती वाढविणो अपरिहार्य असून, त्यात प्रति लिटर 1़69 रुपये वाढ करण्यात आल्याचे त्यात म्हटले आह़े