शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

मोदी सरकारनं घेतले चार मोठे निर्णय; उज्ज्वला लाभार्थ्यांना मोफत LPG सिलिंडर मिळतच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 14:53 IST

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर मंत्रिमंडळाच्या निर्णयाविषयी माध्यमांशी संवाद साधणार आहेत. 

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट आणि सीसीईए (सीसीईए) बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळाने तीन प्रस्तावांना मान्यता दिली असून, कृषी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १ लाख कोटी रुपयांच्या अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंटला परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यापारी आणि कर्मचार्‍यांच्या हितासाठी 24 टक्के ईपीएफ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) मदतीसही परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत एलपीजी सिलिंडर (एलपीएफ सिलिंडर) लाभार्थ्यांना पुढेही मिळत राहणार आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर मंत्रिमंडळाच्या निर्णयाविषयी माध्यमांशी संवाद साधणार आहेत. गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारास मान्यतामंत्रिमंडळाच्या बैठकीत गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत शिधा वाटप करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. हे रेशन पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत वितरित केले जात आहे. मार्चमध्ये सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजचा एक भाग म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली. सरकार गेल्या तीन महिन्यांपासून या योजनेंतर्गत लोकांना मोफत रेशन वितरित करीत आहे, ज्याची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या (एनएफएसए) 80 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना पुढील 5 महिन्यांपर्यंत 5 किलो धान्य आणि १ किलो चणाडाळ मोफत देण्यात येणार आहे. येत्या कृषी आणि सणासुदीच्या हंगामात होणा-या खर्चामुळे 80 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.व्यापारी आणि कर्मचार्‍यांना भेटसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेटने व्यापारी आणि कर्मचार्‍यांना 24 टक्के ईपीएफ देण्यास मान्यता दिली आहे. पंतप्रधान गरीब पॅकेजअंतर्गत ज्या कंपन्यांमध्ये १००पर्यंत कर्मचारी उपस्थित आहेत आणि त्यातील ९० टक्के कर्मचारी दरमहा १५ हजार रुपयांपेक्षा कमी पैसे कमवतात, अशा कंपन्या आणि त्यांच्या कर्मचार्‍यांच्या ईपीएफमध्ये सरकारकडून मार्च ते ऑगस्ट २०२०पर्यंतचे योगदान दिले जाणार आहे. मे महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत (पीएमजीकेवाय) लाभ तीन महिन्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा केली. सरकार ईपीएफच्या 24 टक्के अंशदान ऑगस्टपर्यंत भरेल. यामुळे 3.67 लाख कंपन्या आणि 72.22 लाख कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे.उज्ज्वला योजनेचा विस्तारमंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे उज्ज्वला योजनेंतर्गत गरिबांना मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचा विस्तार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने मोफत एलपीजी सिलिंडर योजनेचा उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत विस्तार केला आहे. म्हणजेच त्यांना आणखी विनामूल्य एलपीजी सिलिंडर मिळणे सुरूच राहणार आहे. तेल कंपन्या ईएमआयसंदर्भात योजनेचा कार्यकाळ पुढील एक वर्षासाठी वाढवू शकतात, जी या वर्षी जुलै 2020मध्ये संपत आहे. याचाच अर्थ पुढील एका वर्षासाठी एलपीजी सिलिंडर (एलपीजी सिलिंडर) खरेदी करणा-या उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना तेल कंपन्यांना कोणतीही ईएमआय रक्कम देण्याची गरज भासणार नाही. उज्ज्वला योजनेत अशी तरतूद आहे, जेव्हा तुम्ही एलपीजी कनेक्शन घेता तेव्हा गॅस स्टोव्हसह एकूण किंमत 3,200 रुपये असते. ज्यामध्ये 1,600 रुपये अनुदान थेट सरकारकडून दिले जाते आणि तेल कंपन्या उर्वरित 1,600 रुपये देतात. परंतु ग्राहकांना ही रक्कम ईएमआयच्या स्वरूपात तेल कंपन्यांना द्यावी लागते. 1 लाख कोटी रुपयांचा अ‍ॅग्री इन्फ्रा फंड मंजूरकृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १ लाख कोटी रुपयांच्या अ‍ॅग्री इन्फ्रा फंडाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजदरम्यान अर्थमंत्र्यांनी कृषी उत्पादनांची देखभाल, वाहतूक आणि विपणन सुविधांच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी रुपयांचा एग्री इन्फ्रा फंड जाहीर केला होता. अर्थमंत्री म्हणाल्या होत्या की, शेतकरी थंड, उष्णता, पाऊस आणि सर्व प्रतिकूल परिस्थिती असून, उत्पादन घेत करतो आणि 130 कोटी देशवासीयांचं पोटासाठी अन्न उपलब्ध करून देतो. परंतु पिकांच्या साठवण व खरेदीसाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे त्यांना बरेच नुकसान सहन करावे लागत आहे. हे लक्षात घेता कोल्ड स्टोरेज, कापणीनंतरचे व्यवस्थापन इत्यादींसाठी 1 लाख कोटींचा निधी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा

राजगृह निवासस्थानावर हल्ला करणाऱ्या मनोवृत्तीचा निषेध- बाळासाहेब थोरात

एक शरद; सगळे गारद! पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीतील फरक

India China FaceOff : लेहमध्ये भारतानं अपाचे अन् T-90 टँक तैनात केल्यानं चीन भडकला, भारताला दिली धमकी

CoronaVirus: बापरे! कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुन्हा संक्रमित होण्याची भीती, वैज्ञानिकांचा मोठा खुलासा

SBIचं कोट्यवधी ग्राहकांना मोठं गिफ्ट! 14व्यांदा घटवले व्याजदर, आता EMI होणार कमी

भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर रघुराम राजन म्हणतात...

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत २७ जवानांचा मृत्यू, ८७२ रेल्वे कर्मचारी संक्रमित

STFने आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अमर दुबेला केले ठार

मुलांच्या उज्ज्वल 'भविष्या'साठी 'या' बँकेनं सुरू केले नवे खाते, मिळणार भरपूर फायदे

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीProvident Fundभविष्य निर्वाह निधी