मोदी सरकारला वेध विस्ताराचे

By Admin | Updated: June 28, 2014 01:08 IST2014-06-28T01:08:49+5:302014-06-28T01:08:49+5:30

कारभाराचे तीस दिवस पार करणा:या मोदी सरकारला आता मंत्रिमंडळ विस्तार व बदलाचे वेध लागले आहेत.

Modi government to spread the perforation | मोदी सरकारला वेध विस्ताराचे

मोदी सरकारला वेध विस्ताराचे

>रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
कारभाराचे तीस दिवस पार करणा:या मोदी सरकारला आता मंत्रिमंडळ विस्तार व बदलाचे वेध लागले आहेत. सात जुलैपासून सुरू होणा:या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी, म्हणजे 2 किंवा 3 जुलै रोजी विस्तार होऊ शकतो. आठ ते दहा मंत्र्यांना शपथ देण्याची तयारी केली जात आहे. प्रथम 22 व नंतर 25 जून रोजी हा शपथविधी होणार होता. 
अरूण जेटली, व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, रवीशंकर प्रसाद  या  कॅबिनेट मंत्र्यांकडे तर पीयूष गोयल, डॉ. जीतेंद्र सिंग, विष्णूदेव साई व प्रकाश जावडेकर स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांवर दोनपेक्षा अधिक  मंत्रलयाचा कारभार आल्याने अधिवेशनापूर्वी  विस्तार व मंत्रलयाची विभागणी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रंनी सांगितले.  
या सरकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता 22 मंत्री, 1क् स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री व 18 राज्यमंत्री आहेत. यापैकी आठ जणांवरील अतिरिक्त  प्रभार नव्या मंत्र्यांकडे विभागून दिला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  सूत्रंनी सांगितले, अधिवेशानादरम्यान सरकारची बाजू नीटपणो मांडण्यासाठी हा बदल होईल. तसेच राज्यस्थान, हिमाचलप्रदेश व उत्तराखंड या राज्यांसह प्रादेशिक  समतोल साधण्याचाही प्रयत्न यातून होणार असल्याने महाराष्ट्राच्या वाटय़ाला एक कॅबिनेटमंत्री व दोन राज्यमंत्रीपदे येऊ शकतात. 
मागच्या शपथविधीला राहून गेलेले हंसराज अहिर यांच्या नावासाठी  संघाने आग्रह धरला असून, महाराष्ट्र भाजपाने आमदार  पंकजा मुंडे यांच्या नावाला आधीच बळ दिले आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून नवी नावे सध्या तरी चर्चेत नाहीत. त्यातल्या त्यात अहीर यांच्या नावावर पुन्हा फुली बसू शकते. 
 
च्भाजपातील एका सूत्रने सांगितले, मागील संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये 32 कॅबिनेट, 12 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री व 33 राज्यमंत्री होते. सरकार गतीमान करायला मंत्र्यांचा असा आकृतीबंध गरजेचा असतोच असे नाही, पण सध्याच्या मंत्र्यांकडे अतिरिक्त कार्यभार असल्याने सकरकारी योजनांची अंमलबजावणी , लोकांची कामे तुंबून पडू नये म्हणून फेरबदल व विस्ताराची अपरिहार्यता भाजपाच्या समन्वय समितीकडे  संघातून यापूर्वीच कळविण्यात आलेली आहे.
च् त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुढय़ात की  15 ऑगस्टनंतर  हा बदल होतो, हे 28 व 29 रोजी सूरजकुंड येथे होणा:या भाजपाच्या खासदार प्रशिक्षण बैठकीनंतर स्पष्ट होईल. 

Web Title: Modi government to spread the perforation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.