शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Ayodhya Ram Mandir: बोला, कधी उभारताय राम मंदिर; मला आज तारीख हवीय: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 17:19 IST

राम मंदिराच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक

अयोध्या: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेनं कायदा करावा, असा अल्टिमेटम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला दिला आहे. सरकारनं संसदेत कायदा करुन राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करावा. शिवसेना संसदेत यासाठी सरकारच्या पाठिशी उभी राहील, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. श्रद्धा न्यायालयात मोजली जाऊ शकत नाहीत, असं म्हणत राम मंदिरासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहू नका, असं सूचक विधान त्यांनी केलं. अयोध्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्यावरुन मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं. 'हिंदूंनी आणखी किती काळ राम मंदिराची वाट पाहायची. आता हिंदू मार खाणार नाही, असं अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. त्याचप्रमाणे आता हिंदू स्वस्थ बसणार नाही. मंदिर कधी उभारणार, हा प्रश्न तो विचारणारच,' अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला ठणकावलं. झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी मी इथं आलोय, असंही ते म्हणाले.मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नहीं बताएंगे, याचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केलं. मला आज तारीख हवीय. बोला, कधी उभारताय राम मंदिर, असा सवाल त्यांनी केला. श्रद्धा न्यायालयात मोजली जाऊ शकत नाही. त्यामुळे सरकारनं न्यायालयाच्या निर्णयापूर्वी संसदेत राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा करावा. शिवसेना त्यावेळी संसदेत सरकारच्या बाजूनं उभी राहील, असं ठाकरे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा