Modi Government: वृद्धांना मोफत मेडिकल किट, मोफत तपासणी; 10 ऑक्टोबरपासून मोहिम सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 11:12 PM2021-10-06T23:12:00+5:302021-10-06T23:16:44+5:30

Free medical Kits and checkup for 75 years old: पुढील आठवड्यापासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

Modi government to provide medical kits to the elder people; campaign will start from October 10 | Modi Government: वृद्धांना मोफत मेडिकल किट, मोफत तपासणी; 10 ऑक्टोबरपासून मोहिम सुरू होणार

Modi Government: वृद्धांना मोफत मेडिकल किट, मोफत तपासणी; 10 ऑक्टोबरपासून मोहिम सुरू होणार

googlenewsNext

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची दणक्यात सुरुवात करण्यात येणार आहे. या निमित्ताने मोदी सरकार 75 वर्षांवरील लोकांसाठी मोफत मेडिकल किट (Free medical kit) वाटणार आहे. 10 ऑक्टोबरला देशभरात पसरलेल्या प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांद्वारे (jan aushadhi centers) हे किट वाटप केले जाणार आहे. याचबरोबर या केंद्रांवर मोफत मेडिकल चेकअप आयोजित केले जाणार आहे. 

पंतप्रधान जन औषधी केंद्रांचे संचलन करणाऱ्या रसायन आणि औषधे मंत्रालयाने पुढील आठवड्यापासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार देशात 8,300 पंतप्रधान जन औषधी केंद्रे आहेत. त्याद्वारे 10 ऑक्टोबरपासून 75 वर्षांपेक्षा अधिक वर्षे वयाच्या नागरिकांना मोफत मेडिकल किट वितरित केले जाणार आहे. यामध्ये कोणकोणती औषधे आणि उपकरणे असतील याबाबत त्यांनी काहीही माहिती दिलेली नाही. पुढील दोन दिवसांत यामध्ये काय काय असेल यासाठी अंतिम निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. 

पंतप्रधान जन औषधी केंद्रांद्वारे देशभरात जेनरिक औषधे उपलब्ध केली जातात. या औषधांच्या किंमती स्वस्त असतात. 2022 पर्यंत 8300 केंद्र उघडण्याचे लक्ष्य देण्यात आले गोते. ते सप्टेंबरमध्येच पूर्ण झाले आहे. 2024 पर्यंत सरकारने 10000 केंद्रे उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता मंत्रालय ही संख्या वाढविण्याचा विचार करत आहे. 

या केंद्रांद्वारे सध्या 450 जेनरिक औषधे आणि उपकरणे विकली जात आहेत. यामध्ये आणखी काही उत्पादनांची वाढ केली जाणार आहे. यासाठी गुडगाव, चेन्नई आणि गुवाहाटीमध्ये मोठमोठे वेअरहाऊस निर्माण करण्यात आले आहेत. सूरतमध्ये चौथ्या वेअर हाऊसचे काम सुरु आहे. सरकारने पुरवठ्यासाठी 37 वितरकांची नियुक्ती केली आहे.

Web Title: Modi government to provide medical kits to the elder people; campaign will start from October 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.