शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

लोकसंख्या नियंत्रणासाठी मोदी सरकार कायदा करणार?; कायदेमंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 6:15 PM

तीन महत्त्वाच्या निर्णयानंतर मोदी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

नवी दिल्ली: तिहेरी तलाक, कलम ३७०, सुधारित नागरिकत्व कायदा ही तीन महत्त्वाची पाऊलं उचलल्यानंतर आता मोदी सरकार लवकरच आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय कायदा मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी याबद्दलचे सूतोवाच केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर लवकरच भाजपाकडून काम सुरू केलं जाऊ शकतं. तसे संकेत प्रसाद यांनी दिले आहेत. गेल्या सात महिन्यांमध्ये मोदी सरकारनं तीन मोठ्या आश्वासनांची पूर्तता केली. त्यावर भाष्य करताना, आम्ही जनतेला कोणताही आश्चर्याचा धक्का दिला नसल्याचं प्रसाद म्हणाले. मागील सात महिन्यांमध्ये मार्गी लावलेल्या कायद्यांचं आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिलं होतं. पुन्हा सत्तेवर येताच आम्ही त्यांची पूर्तता केली, असं प्रसाद यांनी सांगितलं. मोदींनी लोकसंख्या वाढीला वेसण घालण्याची गरज लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात व्यक्त केली होती, याची आठवण त्यांनी करुन दिली. भारतीयांनी लोकसंख्या नियंत्रणाचा विचार करायला हवा, असं आवाहन मोदींनी भाषणातून केलं होतं. पंतप्रधान नेहमीच लाल किल्ल्यावरुन महत्त्वाच्या घोषणा करतात. देशानं लोकसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला हवीत. आता देशाची लोकसंख्या १३० कोटी इतकी आहे, असं मोदींनी म्हटल्याचं त्यांनी सांगितलं. राजस्थानातल्या ग्रामपंचायतींमध्ये असा नियम आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. राजस्थानात एकपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना उमेदवारी मिळत नाही, असं प्रसाद यांनी सांगितलं. केंद्र सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणणार का, असा प्रश्न प्रसाद यांना विचारण्यात आला. त्यावर मी देशाचा नागरिक आहे. खासदार आहे आणि वकीलदेखील आहे. मला घटना समजते आणि देशदेखील समजतो. त्यामुळेच मला देशाची चिंता आहे आणि याच नात्यानं मी हे बोलतोय, असं उत्तर प्रसाद यांनी दिलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकtriple talaqतिहेरी तलाक