शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

मोदी सरकारने खोटेपणा केला; इराकमधून जिवंत परतलेल्या हरजितने वाचला अन्यायाचा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 10:29 AM

मोसूलमधून अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांमधून जिवंत बचावलेला 27 वर्षीय हरजित मसिह स्वतःच्या विधानावर अद्यापही ठाम आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने 2014मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व 39 भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली होती.

अमृतसर- इराकमधल्या मोसूलमधून अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांमधून जिवंत बचावलेला 27 वर्षीय हरजित मसिह स्वतःच्या विधानावर अद्यापही ठाम आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने 2014मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व 39 भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली होती. मात्र या 40 जणांमधून जिवंत बचावलेला हरजित मसिह यानं दिलेली माहिती चुकीची असल्याचा दावा सुषमा स्वराज यांनी केला आहे.सरकारनं भारतीयांचं अपहरण करून त्यांना ठार केल्याच्या वृत्तावर विश्वास का ठेवला नाही, असा सवाल हरजित मसिह यानं विचारला होता. इसिसच्या जाळ्यातून सुखरूप सुटलेले हरजित मसिह म्हणाला, 11 जून 2014ला केंद्र सरकारला भारतीयांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची माहिती दिली होती. इसिसच्या जाळ्यातून सुटलेले मसिह हे एकटेच असल्याचा त्याचा दावा आहे. त्याच्यासमोर 39 भारतीय मजुरांची हत्या करण्यात आली होती. मसिह त्या 40 नागरिकांमधील एक आहे. ज्याचं इराकमधल्या मोसूल शहरात इसिस या दहशतवादी संघटनेनं अपहरण केलं होतं. दहशतवाद्यांनी त्यावेळी बांगलादेशी आणि भारतीयांचे दोन वेगवेगळे गट बनवले होते. तसेच बांगलादेशींना जाण्याची परवानगी दिली होती. हे सर्व मजूर मोसूलमध्ये टेक्सटाइल कारखान्यात कामाला होते. सरकारनं मला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं आणि 39 इतरांच्या कुटुंबीयांना खोटी आश्वासनं दिली होती. मी इसिसनं 39 लोकांना मारल्याचं वृत्त सरकारला सांगितलं होतं. परंतु माझ्यावर सरकारनं विश्वास ठेवला नाही. सरकारनं इसिसच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या 39 कुटुंबीयांना खोटी आश्वासनं दिली.मसिह सध्या गुरदासपूरमधल्या बाजारात मजूर म्हणून काम करत आहे. मसिहच्या मते, मला सहा महिन्यांपर्यंत जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, पण मी सरकारला सर्व काही खरं सांगितलं होतं. त्यावेळी केंद्र सरकारनं माझ्यावर विश्वास ठेवला नाही. जवळपास 6 महिने मी तुरुंगात होतो. याची भरपाई कोण करणार ?, मसिहच्या कुटुंबीयांनी त्याला इराकला पाठवण्यासाठी 1.5 लाख रुपये उधारीवर घेतले होते. हरजित यांच्या मते, इसिसच्या दहशतवाद्यांनी 40 भारतीयांचं अपहरण करत त्यांचा खून केला. परंतु त्यातून मी थोडक्यात बचावलो आणि लागलीच कारखान्यात गेलो. तिथे मला बांगलादेशी मजुरांनी स्वतःचे कपडे दिले. त्यांच्यासोबत मी अली बनून पळालो. त्यावेळी एका बांगलादेशीनं माझा सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क करून दिला आणि मी भारतात परतलो. परंतु सुषमा स्वराज यांनी हरजित मसिह हा खोटं बोलत असल्याचं सांगितलं आहे. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज