शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्था रुळावरुन घसरली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 11:04 IST

2008 मधील मंदीच्या धक्क्यातून बाहेर आलेली भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या कार्यकाळात रुळावरुन घसरली असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्दे2008 मधील मंदीच्या धक्क्यातून बाहेर आलेली भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या कार्यकाळात रुळावरुन घसरली असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 'ज्या लोकांनी अर्थव्यवस्था वर येईल असे विचार मांडले होते. ते लोक आता निराश होऊन सरकारला सोडून जात आहेत. ते खोटे आकडेवारी तयार करतात आणि त्यासाठी लोकांना भरीस पाडतात' 8 फेब्रुवारी रोजी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 2008 मधील मंदीच्या धक्क्यातून बाहेर आलेली भारतीय अर्थव्यवस्था मोदी सरकारच्या कार्यकाळात रुळावरुन घसरली असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 2008 मध्ये विकास दर हा 7.5 टक्के होता. 

'ज्या लोकांनी अर्थव्यवस्था वर येईल असे विचार मांडले होते. ते लोक आता निराश होऊन सरकारला सोडून जात आहेत. ते खोटे आकडेवारी तयार करतात आणि त्यासाठी लोकांना भरीस पाडतात' असा आरोप चिदंबरम यांनी केला आहे. 'अनडॉन्टेड: सेविंग द आयडिया ऑफ इंडिया' या पुस्तकात पी. चिदंबरम यांनी हे म्हटले आहे. 8 फेब्रुवारी रोजी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

'एक जुनी सभ्यता जी अनेक धर्म, संस्कृती, भाषा, समुदाय आणि जातींना जोडून ठेवली आहे. गेल्या 71 वर्षांदरम्यान आधुनिक राष्ट्र होण्याच्या दिशेने प्रयत्न केला. मात्र आज त्याचे इतके ध्रुवीकरण आणि विभाजन केले आहे की, त्यापासून आपल्या लोकांना वाचवणे हे चिंतेचे खरे कारण बनले आहे' असे चिदंबरम यांनी आपल्या पुस्तकाबाबत सांगताना म्हटले आहे. 

चिदंबरम यांनी काही दिवसांपूर्वी पीयूष गोयल यांनी केलेली नोकरभरतीची घोषणा म्हणजे 'आणखी एक जुमला' असल्याची टीका केली होती. पाच वर्ष शांत बसलेल्या या सरकारला अचानक रिक्तपदं भरण्यासाठी आता जाग आली, असा खोचक टोलादेखील चिदंबरम यांनी लगावला होता. तसेच चिदंबरम यांनी गुरुवारी (24 जानेवारी) मोदी सरकारवर ट्वीटरवरुन शाब्दिक हल्ला चढवला होता. ''रेल्वेमध्ये जवळपास पाच वर्षांपासून 2,82,976 पदं रिक्त आहेत. सरकार आता अचानक झोपेतून जागे झाले आहे. तीन महिन्यांमध्ये या रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. हा आणखी एक जुमला आहे, असे ट्वीट चिदंबरम यांनी केले होते. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाBJPभाजपाcongressकाँग्रेस