शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 21:36 IST

मोदी सरकारने या योजनेचे केवळ नावच बदलले नाही, या योजनेच्या लाभातही वाढ केली आहे...

केंद्र सरकारने शुक्रवारी (१२) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा - MGNREGA) योजनेचे नाव बदलले असून आता ही योजना 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' नावाने ओळखली जाईल. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेचे नाव बदलण्यास आणि कामाचे दिवस वाढवण्यास मंजुरी दिली आहे.

१०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी -मोदी सरकारने या योजनेचे केवळ नावच बदलले नाही, या योजनेच्या लाभातही वाढ केली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कामाच्या दिवसांची संख्या आता १०० वरून वाढवून १२५ दिवस करण्यात आली आहे. अर्थात, आता ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला एका आर्थिक वर्षात १०० ऐवजी १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे.

योजनेत १५ कोटींहून अधिक लोक सक्रिय -मनरेगा ही यूपीए-१ (UPA-I) सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक असून, २००५ मध्ये सुरू करण्यात आली होती. ग्रामीण भागातील कुटुंबांना उपजीविकेची सुरक्षा पुरवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या या योजनेत १५ कोटींहून अधिक लोक सक्रियपणे काम करत आहेत, यात सुमारे एक-तृतीयांश महिलांचा समावेश आहे. 

सुरुवातीला या योजनेचे नाव राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असे होते, यानंतर २००९ मध्ये या योजनेचे नाव बदलून 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना' असे करण्यात आले होते. आता या महत्त्वपूर्ण योजनेला 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' म्हणून ओळखले जाईल आणि १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी मिळेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : MGNREGA Renamed, Workdays Increased: Modi Government's New Scheme

Web Summary : The central government renamed MGNREGA to 'Poojya Bapu Gramin Rozgar Yojana' and increased guaranteed workdays from 100 to 125. This change aims to provide more livelihood security to rural families, benefiting over 15 crore active workers, including a significant number of women.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस