शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील मोदी सरकार दलितविरोधी, राहुल गांधींची घणाघाती टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:00 IST

दलितांच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

नवी दिल्ली - दलितांच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे एससी एसटी विधेयकासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार हे दलित विरोधी असल्याचे सांगितले. देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत. देशात कुठेही दलित अत्याचाराविरोधात बोलावले जाईल, तिथे आपण जाऊ, असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत सीताराम येचुरी हेसुद्धा उपस्थित होते.  जंतर मंतर येथे उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि धोरणे दलितविरोधी आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी दलितांना स्वच्छता करण्यामधून आनंद मिळतो असा दावा केला होता. जर  मोदींना दलितांचे दु:ख माहीत असते तर त्यांची धोरणे वेगळी असती." 

एससी एसटी कायदा कमकुवत करण्यासाठी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधी यांवी केला. "ज्या न्यायाधीशांनीं एससी एसटी कायद्यात बदल करून तो कमकुवत केला, त्या व्यायाधीशांना मोठे पद दिले, भारताच्या भविष्यात दलितांना कोणतेही स्थान असू नये असे मोदींना वाटते," असा आरोप त्यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी दलित संघटनांना आवाहनदेखील केले. "आपण सर्वांनी एकजूट होऊन भाजपा आणि संघाच्या विचारांना पराभूत करायचे आहे. त्यांचे विचार द्वेष पसरवणारे आहेत, तर काँग्रेस पक्ष प्रेमाने सर्वांना सोबत घेऊन चालणे जाणतो. 2019 मध्ये मोदी सरकारचा पराभव अटळ आहे आणि आपण सर्वांनी मिळून त्यांना पराभूत केले पाहिजे. तुम्ही देशात कुठेही आंदोलन केले तरी आम्ही तुमच्या सोबत राहू. मी तुमच्यासाठी नेहमीच उभा राहीन."असे राहुल गांधी म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणDalit assaultदलितांना मारहाणnewsबातम्या