शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'या' 4 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या 4 वर्षांत सोडली मोदी सरकारची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 15:18 IST

मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी काल राजीनामा दिला

नवी दिल्ली: मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. सुब्रमण्यन वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं. सुब्रमण्यन यांच्या आधी तीन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी मोदी सरकारची साथ सोडली आहे. अरविंद सुब्रमण्यन: सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी बुधवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्य आर्थिक सल्लागार हे आपलं सर्वात आवडतं काम होतं आणि अरुण जेटली हे सर्वोत्तम बॉस होते, असं त्यांनी राजीनामा देताना म्हटलं. सुब्रमण्यन सप्टेंबरपर्यंत त्यांचं पद सोडणार आहेत. अरविंद पानगढिया: गेल्या वर्षी पानगढिया यांनी निती आयोगाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. कोलंबिया विद्यापीठातील अध्यापन पुन्हा सुरु करण्यासाठी राजीनामा देत असल्याचं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं. पानगढिया दीड वर्ष निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी होते. रघुराम राजन: जून 2016 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहिलं होतं. सप्टेंबर महिन्यात कार्यकाळ संपल्यावर पुन्हा अध्यापनाकडे वळणार असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं. राजन यांच्या राजीनाम्याची खूप चर्चा झाली होती. राजन यांना गव्हर्नरपदी राहण्याची इच्छा होती. मात्र सरकारची आर्थिक धोरणं पटत नसल्यानं त्यांनी पायउतार होणं पसंत केल्याचं वृत्त त्यावेळी अनेक वृत्तपत्रांनी दिलं होतं. विजयलक्ष्मी जोशी: स्वच्छ भारत अभियानाला एक वर्ष पूर्ण होण्याआधी जोशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे या अभियानाचं प्रमुखपद होतं. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्या गुजरात केडरच्या आयएएस अधिकारी होत्या.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRaghuram Rajanरघुराम राजनReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNIti Ayogनिती आयोगBJPभाजपाArvind Subramanianअरविंद सुब्रमण्यनPoliticsराजकारण