शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सुरत अपघाताबद्दल मोदींनी व्यक्त केला शोक, मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत

By महेश गलांडे | Updated: January 19, 2021 10:00 IST

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही अपघातातील मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, अपघाताच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केलीय. 

ठळक मुद्देपीडित कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो, तर जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

नवी दिल्ली - गुजरातच्या सुरतमध्ये भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. सूरतच्या पिपलोद गावांनजीक एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 18 मजूरांना चिरडले. त्यामध्ये, 14 जणांचा मृत्यू झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत 14 जणांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. या घनटेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. या दुर्घटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही शोक व्यक्त केलाय.   ऊसाची वाहतूक करणारा ट्रक अतिशय वेगात पुढे जात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे, गाडी नियंत्रणात न आल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन तो ट्रक झोपलेल्या मजूरांच्या अंगावर गेला. या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक मजूरीचं काम करत असून सर्वचजण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, राजस्थान आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. 

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही अपघातातील मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, अपघाताच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केलीय. 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही अपघाताच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केले असून जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. अपघाताची ही घटना मनाला अतिशय वेदना देणारी असून पीडित कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत, असे गेहलोत यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या सुरतमधील भीषण अपघात दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो, तर जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. तसेच, अपघातातील मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीतून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींना उपचारासाठी 50 हजारांची मदत देण्यात येणार आहे. पीएमओ कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

 

टॅग्स :AccidentअपघातNarendra Modiनरेंद्र मोदीSuratसूरतPoliceपोलिसVijay Rupaniविजय रूपाणी