शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

''मोदींना खुलं आव्हान! हार्दिक पटेलविरोधात जिंकून दाखवा, राजकारण सोडेल''  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 21:58 IST

पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलविरोधात लढवून दाखवावी. जर ते हार्दिकविरोधात जिंकले तर मी राजकारण सोडून देईन

मुंबई: गुजरातमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकणारे युवा नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले आव्हान दिले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हार्दिक पटेलविरोधात निवडणूक जिंकून दाखवावी. जर नरेंद्र मोदी जिंकले तर मी राजकारण सोडून देईन असं वक्तव्य जिग्नेश मेवाणी यांनी केलं आहे. 

इंग्रजी न्यूज चॅनल टाइम्स नाऊवर यंदाच्या गुजरात निवडणुकांवर आपली खास छाप पाडणारे तीन तरूण नेते हार्दिक पटेल,अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांची मुलाखत सुरू होती. या दरम्यान या तिघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या धोरणांवर टीका केली. मुलाखती दरम्यान महिला अॅंकरने भविष्यातील राजकारणाविषयी विचारणा केली. त्यावर गुजरात निवडणूक ही तर केवळ सुरूवात आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी भाजपासारख्या फॅसिस्ट शक्तींविरोधात प्रचार करू असं उत्तर तिघांनी दिलं. 

त्यानंतर महिला एंकरने, तुम्ही पंतप्रधानांना टक्कर देऊ शकतात असं वाटतं का? हा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुलं आव्हान दिलं. पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी  2019 ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलविरोधात लढवून दाखवावी. जर ते हार्दिकविरोधात जिंकले तर मी राजकारण सोडून देईन असं खुलं आव्हान जिग्नेश मेवाणी यांनी दिलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच जिग्नेश मेवाणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय झाले आहे त्यांनी लवकरच राजकारणातून संन्यास घ्यावा अशी खोचक टीका केली होती.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय झाले आहे त्यांनी लवकरच राजकारणातून संन्यास घ्यावा अशी खोचक टीका काही दिवसांपूर्वीच जिग्नेश मेवाणीने केली होती. त्यानंतर मोठा वाद उफाळला होता. भाजपाने हे विधान म्हणजे पंतप्रधानांचा अपमान असल्याचं म्हणत माफी मागावी अशी मागणी केली होती.  

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीhardik patelहार्दिक पटेलNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकAlpesh Thakorअल्पेश ठाकुर