शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेनंतर आम्हीच! भाजपच्या छोट्या भावानं मागितला सत्तेत वाटा; लवकरच मोठा निर्णय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 11:58 IST

भाजपच्या मित्रपक्षाला हवाय सत्तेत वाटा; लवकरच मोदी सरकारचा विस्तार अपेक्षित

पाटणा: जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या मित्रपक्षांना संधी दिली जाऊ शकते. शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलानं भाजपसोबतची मैत्री तोडत एनडीएच्या बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता बाकीच्या मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून मोदींच्या मंत्रिमंडळात मित्र पक्षांना मानाचं स्थान दिलं जाऊ शकतं.

बिहारमध्ये एनडीएचा भाग असलेल्या संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी मंत्रिमंडळात सन्मानजनक हिस्सा देण्याची मागणी केली आहे. 'मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच अपेक्षित आहे. त्यात एनडीएच्या सर्व घटक पक्षांना जागा मिळायला हवी. सत्तेत केवळ नावाला वाटा नको, तर तो सन्मानजक असायला हवा,' असं सिंह म्हणाले. भाजपला मोठा भाऊ करणारा 'मोदींचा हनुमान' सापडला संकटात; छोटा भाऊ ५ खासदार फोडणार?

२०१९ मध्ये भाजपला प्रचंड यश मिळालं. मात्र त्यावेळी जेडीयूनं सत्तेत सहभागी होण्यास नकार दिला. त्यावेळी नितीश कुमार जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मंत्रिमंडळात केवळ एकच पद मिळत असल्यानं त्यांनी सरकारमध्ये सामील होण्यास नकार दिला. त्यावेळी मंत्रिपदासाठी राज्यसभा खासदार रामचंद्र प्रसाद सिंह आणि राजीव रंजन सिंह यांची नावं आघाडीवर होती. आता रामचंद्र प्रसाद सिंह यांच्याकडेच पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद असून जेडीयूनं सत्तेत वाटा मागितला आहे.पासवानांच्या पक्षात उभी फूट, स्वकीयांनीच केला चिराग यांचा गेम, जाणून घ्या कोण आहेत पशुपती पारस

शिवसेनेनं २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्यानं आता जेडीयू एनडीएमधील भाजपचा प्रमुख साथीदार आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ उमेदवार निवडून आले. तर जेडीयूचे १६ उमेदवार विजयी झाले.

टॅग्स :Janta Dal Unitedजनता दल युनायटेडNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा