मोदी @ ५ रेसकोर्स

By Admin | Updated: May 31, 2014 06:16 IST2014-05-31T06:16:50+5:302014-05-31T06:16:50+5:30

शपथविधीनंतर पाच दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विधिवत पूजा करून शुक्रवारी रेसकोर्स रोडवरील पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी राहण्यासाठी आले

Modi @ 5 Race Course | मोदी @ ५ रेसकोर्स

मोदी @ ५ रेसकोर्स

नवी दिल्ली : शपथविधीनंतर पाच दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी विधिवत पूजा करून शुक्रवारी रेसकोर्स रोडवरील पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी राहण्यासाठी आले आहेत; परंतु त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सात रेसकोर्स या बंगल्यात राहण्याऐवजी पाच रेसकोर्स रोड या बंगल्याला पसंती दिली आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी गुजरात भवन येथे वास्तव्याला होते आणि तेथूनच राजकीय सूत्रे हलविण्यास सुरुवात केली होती. आज सकाळी ते ५, रेसकोर्स रोडला पोहोचले आणि तेथे छोटेखानी पूजाही केली. त्यांचे बहुतांश सामानही नवीन घरात पोहोचले आहे. ते बंगला क्रमांक ७ ऐवजी ५ मध्ये राहणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी २६ मे रोजी मोदी यांच्या शपथविधीनंतर रेसकोर्स रोडवरील निवासस्थान रिक्त केले होते; परंतु तेथे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मोदी राहण्यास गेले नव्हते. ७ रेसकोर्स बंगल्यात त्यांचे निवासी कार्यालय असणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Modi @ 5 Race Course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.