शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

मौदा.. लुटमार

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

लुटमारप्रकरणी पाच जणांना अटक

लुटमारप्रकरणी पाच जणांना अटक
अन्य तीन आरोपी फरार : मौद्यातील घरफोडीची घटना
मौदा : चोरट्यांनी भरदिवसा घरात शिरून फिर्यादीस मारहाण करीत गंभीर जखमी केले; शिवाय घरातील २५ हजार रुपये रोख व ३० तोळे सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला. ही लुटमारीची घटना मौदा येथील लापका मार्गावर १४ फेब्रुवारीला घडली होती. तीन दिवसांच्या तपासकार्यानंतर या घटनेतील मुख्य आरोपीसह पाच आरोपींना पकडण्यात मौदा पोलिसांना यश आले; अन्य तीन फरार आरोपींचा मौदा पोलीस शोध घेत आहेत.
संदीप मनीराम यादव (२५), प्रवीण यादव शहारे (२१) बंटी ऊर्फ कमलेश ओमप्रकाश कावळे (२५) तिन्ही रा. रामटेक तर विलास महादेव लांजेवार (४०, रा. शास्त्रीनगर, नागपूर) व सराफा व्यापारी नंदू माधवराव पिंजरकर (३२, रा. हिवरी ले-आऊट, नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मौदा पोलिसांनी आरोपी बंटी कावळे, संदीप वासनिक व प्रवीण शहारे यांच्याकडून अनुक्रमे १२,०००, १२,००० व १०,००० असे एकूण ३४ हजार रुपये रोख जप्त केले, तसेच एक सोनसाखळी व एक सोन्याचे ब्रेसलेट जप्त केले आहे. सदर तिन्ही आरोपींनी नागपूर येथील मित्रांच्या माध्यमाने नागपुरातील एका ज्वेलर्सला चोरीचे दागिने विकले होते. पोलिसांनी आरोपींच्या मित्रानांही ताब्यात घेतले असून, त्यांची नावे जाहीर केली नाही.
घटनेतील मुख्य आरोपी बंटी ऊर्फ कमलेश कावळे हा मागील आठ दिवसांपासून फिर्यादी टंटू महादेव हटवार (७०, रा. लापका रोड, मौदा) यांच्या घरी असलेल्या सलून दुकानात बसत होता. फिर्यादीकडे मोठ्या प्रमाणात सोने असल्याची त्यास माहिती होती. याबाबत त्याने आपल्या मित्रांना माहिती दिली. रामटेक येथील तीन सराईत गुन्हेगारांना हाताशी घेत चोरट्यांनी रामटेकातील एका हॉटेलमध्ये ही लुटमार करण्याची योजना आखली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
त्यानुसार मुख्य सूत्रधार बंटी कावळे हा फिर्यादीच्या घरावर पाळत ठेवून होता. दरम्यान, शनिवारी चोरट्यांनी भरदिवसा फिर्यादी टंटू हटवार यांच्या घरात शिरून त्यांना मारहाण करीत २५ हजार रुपये रोख व ३० तोळे सोन्याचे दागिने पळविले.