शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! Amazon वरुन 40 हजारांचा मोबाईल मागवला अन् पार्सल उघडताच धक्काच बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 08:48 IST

Amazon Mobile Ordered : अ‍ॅमेझॉनवरून एका व्यक्तीने तब्बल 40 हजारांचा मोबाईल ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र पार्सल उघडून पाहिल्यावर त्या व्यक्तीला मोठा धक्का बसला आहे. 

नवी दिल्ली - ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो.  ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. अ‍ॅमेझॉनवरून एका व्यक्तीने तब्बल 40 हजारांचा मोबाईल ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र पार्सल उघडून पाहिल्यावर त्या व्यक्तीला मोठा धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीलीभीतच्या कनक गावात राहणाऱ्या हरदीप सिंह याने 24 ऑक्टोबरला ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केला होता. अ‍ॅमेझॉनवरून हा फोन मागवण्यात आला असून त्याची किंमत जवळपास 40,000 रुपये होती. पार्सल घरी आल्यावर त्याने जेव्हा ते उघडलं तेव्हा त्याची निराशा झाली कारण त्यामध्ये मोबाईल नव्हताच. मोबाईल ऐवजी एक ड्रेस पार्सलमध्ये होता. संतप्त झालेल्या हरदीपने कंपनीला फोन केला. तेव्हा कंपनीने त्याच्याकडे सात दिवसांचा कालावधी मागून घेतला.

अ‍ॅमेझॉन कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल

सात दिवसांनंतर कंपनीने हरदीपला फोन केला आणि आपल्याकडून काहीच चूक झाली नव्हती. आपण योग्य पार्सल पाठवलं होतं, असं सांगितलं आहे. हरदीपने जहानाबाद पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. जहानाबाद पोलीस ठाण्यातील पोलीस हर्षवर्द्धन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅमेझॉन कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार आमच्याकडे दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आम्ही तपास करत आहोत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Amazon वरुन मागवला 1.40 लाखांचा कॅमेरा पण आल्या चपला आणि दगड

ऑनलाईन वस्तू मागवल्यावर फसवणूक झाल्याच्या अशा अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी अ‍ॅमेझॉनवरून एका व्यक्तीने 1.40 लाखांचा कॅमेरा मागवला होता. मात्र प्रत्यक्षात घरी चपला आणि दगड आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. सुमित चौहान यांनी काही दिवसांपूर्वी ऑनलाईन शॉपिंग करीत कॅमेरा मागविला होता. सुमित यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या अ‍ॅमेझॉनमधून कॅमेरा मागविला होता. मात्र घरी जेव्हा ऑर्डर आली ती पाहून त्यांना धक्काच बसला. बॉक्स उघडल्यानंतर त्यांना कॅमेऱ्याऐवजी जुन्या चपला आणि दगड मिळाले होते. या एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनMobileमोबाइलPoliceपोलिसfraudधोकेबाजी