अंधांना चलनी नोटा सहजपणे ओळखण्यासाठी मोबाइल अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:59 AM2020-01-02T02:59:06+5:302020-01-02T03:06:39+5:30

रिझर्व्ह बँकेचे पाऊल : नोटेचे मूल्य आवाजी पद्धतीने सांगण्याची सोय

A mobile app for easily identifying blind notes for the blind | अंधांना चलनी नोटा सहजपणे ओळखण्यासाठी मोबाइल अ‍ॅप

अंधांना चलनी नोटा सहजपणे ओळखण्यासाठी मोबाइल अ‍ॅप

Next

मुंबई : अंधांना चलनी नोटांचे मूल्य सहजपणे ओळखता यावे यासाठी विकसित केलेल्या मोबाईल अ‍ॅपचा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी येथे शुभारंभ केला. दैनंदिन व्यवहारात देवाण-घेवाण केल्या जाणाऱ्या नोटा किती रुपयांच्या आहेत एवढे अ‍ॅपने कळेल.
‘मोबाइल एडेड नोट आयडेन्टिफायर’ नावाचे हे अ‍ॅप् नि:शुल्क असून अ‍ॅन्डॅईड प्ले स्टोअर व आयओएस अ‍ॅपस्टोअरमधून डाऊनलोड करता येईल. एकदा डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेटची गरज असणार नाही.

नोव्हेंबर २०१६ मध्ये एक हजार व ५०० रुपयांच्या प्रचलित नोटा रद्द केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधी आणि नव्या महात्मा गांधी मालिकेत १०, २०, ५०, १००, ५०० आणि दोन हजार रुपयांच्या निरनिराळ््या आकाराच्या व डिझाईनच्या नोटा चलनात होत्या. या नव्या नोटांमध्ये अंधांना स्पर्शाने फरक ओळखता येईल अशा बाबींचा समावेश होता. तरीही या नोटा ओळखताना अंधांना अडचणी येतात अशा सर्वदूर तक्रारी आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हे नवे सुलभ मोबाईल अ‍ॅप विकसित केले. ते अंधूक प्रकाशात, दिवसा-रात्रीही काम करेल.

हे अ‍ॅप कसे काम करेल?
ज्या नोटेचे मूल्य जाणून घ्यायचे असेल अशी नोट पूर्णपणे अथवा, घडी केलेल्या अवस्थेत मागच्या, पुढच्या अशा कोणत्याही बाजूने मोबाईलच्या मागील बाजूस असलेल्या कॅमेºयासमोर धरा. हे अ‍ॅप त्या नोटेचे मूल्य हिंदी वा इंग्रजीत आवाजी स्वरूपात सांगेल.ज्यांना ऐकू येत नाही किंवा कमी ऐकू येते अशांना नोटेचे मूल्य मोबाईलने हाताला होणाºया कंपनातून समजेल.

Web Title: A mobile app for easily identifying blind notes for the blind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.